नवी दिल्ली : पाकिस्तानला जर सेमी फायमलमध्ये पोहोचायचे असेल तर त्यासाठी आता समीकरण समोर आले आहे. पण पाकिस्तानच्या संघाने जर ३५० धावा केल्या तर त्यांना सेमी फायनलमध्ये पोहोचता येऊ शकते का, याबाबतचे समीकरणही आता समोर आले आहे.पाकिस्तानचा सामना आता इंग्लंडबरोबर होणार आहे. या सामन्यात पाकिस्तानच्या संघाला विजय तर मिळवावा लागणारच आहे, पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांना आपाल रन रेट वाढवावा लागणार आहे. त्यासाठी पाकिस्तानच्या संघाला सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी काय समीकरण असेल, याचे गणित स्पष्ट झाले आहे. पण पाकिस्तानच्या संघाने जर ३५० धावा केल्या तर काय होईल, असा प्रश्न काही चाहत्यांच्या मनात होता. पण पाकिसतान्च्या संघाने जर ३५० धावा केल्या तर ते सेमी फायनलमध्ये पोहोचणार की नाही हे त्यांच्या गोलंदाजांवर अवलंबून असणार आहे. कारण पाकिस्तानने जरी ३५० धावा केल्या तरी ते इंग्लंडला किती धावांत ऑल आऊट करतात हे सर्वात महत्वाचे ठरणार आहे. जर पाकिस्तानने ३५० धावा केल्या तर त्यांना इंग्लंडच्या संघाला ६३ धावांत ऑल आऊट करावे लागणार आहे. पण पाकिस्तानला त्यांना ६३ धावांत ऑल आऊट करता आले नाही आणि त्यांनी सामना जिंकला तरीही त्यांना सेमी फायनलमध्ये पोहोचता येणार नाही. कारण या क्षणी पाकिस्तानला फक्त विजय मिळवून चालणार नाही. पाकिस्तानला विजय तर हवाच पण त्याचबरोबर त्यांना आपला रन रेट हा न्यूझीलंडपेक्षा जास्त ठेवावा लागणार आहे. त्यामुळे पाकिस्तानने जर इंग्लंडचा २८७ किंवा त्यापेक्षा जास्त धावांनी विजय मिळवला तर पाकिस्तानच्या संघाचा रन रेट हा न्यूझीलंडपेक्षा जास्त होईल आणि त्यांना सेमी फायनलमध्ये पोहोचता येणार आहे. पाकिस्तानचा सामना आता इंग्लंडशी होणार आहे. इंग्लंडचे या वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आले आहे. पण या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला तर पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे या सामन्यात कोणता संघ विजय मिळवतो, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *