जालना: भोकरदन तालुक्यातील धावडा येथील जुगार अड्ड्यावर छापा मारून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. बालाजी कॉम्प्लेक्समधील गाळ्यामध्ये श्रीदेवी बाजार नावाचा मटका जुगार खेळला जात असल्याची गुप्त महिती पोलिसांना मिळाली होती. शनिवारी सकाळी सव्वा अकरा वाजता पारध पोलिसांनी अचानक बालाजी कॉम्प्लेक्समधील गाळ्यामध्ये छापा मारला. निराधार वयस्कर दांम्पत्याची दिवाळी फराळा विनाच; धाराशिवमधील वृद्ध जोडपं मुलांच्या आधाराच्या प्रतिक्षेत
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी छाप्यात १६ हजार ५२५ रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त केला. शनिवारी सकाळी सव्वा ११ वाजता ही कारवाई करण्यात आली. सपोनि गुसिंगे यांच्यासह अंमलदार जीवन भालके, शिवाजी भगत पोना गणेश पायघन, वैभव थिगळे यांनी ही कारवाई केली. यावेळी संशयित बाजीराव गणपतराव गवळी (५०, रा धावडा ता. भोकरदन जि. जालना) यास रंगेहाथ पकडले आहे.

गुलालाची पिशवी डोक्यावर ओतली, फटाक्यांची आतिषबाजी करत तालमीत महाराष्ट्र केसरी सिंकंदर शेखचं स्वागत

त्याच्या ताब्यातून रोख ३०२० रुपये, गुगल स्कॅनर, कॅलक्युलेटर, रेडमी कंपनीचा मोबाईल ज्यामध्ये व्हाट्‌‍सॲपवर जुगाराचे आकडे असलेला श्रीदेवी बाजार जुगाराचे आकडे असलेल्या चिठ्ठ्या, पेन, कल्याण बाजार, मिलन बाजार, टाइम बाजार लिहिलेली पाटी ज्यावर वेगवेगळे आकडे लिहिलेले असा एकूण १६ हजार ५२५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयित बाजीराव गणपतराव शिंदे, बाबू त्रिंबक शिंदे यांच्याविरुद्ध पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *