इगतपुरी विधानसभेची जागा शिवसेनेला सोडण्याची मागणी:संपर्कप्रमुख निवृत्ती जाधव यांची पक्षप्रमुखांशी चर्चा
इगतपुरी तालुका शिवसेनेचा गेल्या कित्येक वर्षांपासून बालेकिल्ला आहे. आजपर्यंत पंचायत समिती जिल्हा परिषदेवर शिवसेनेचे सर्वाधिक उमेदवार निवडून आलेले आहेत आणि ग्रामपंचायतीत शिवसेनेचे सरपंच असून त्यामुळे इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघाची विधानसभेची जागा शिवसेनेला मिळावी याबाबत इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे लोकसभा संपर्कप्रमुख निवृत्ती जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबई येथे भेट घेऊन जागा सोडण्याबाबत साकडे घातले आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी नाशिक येथे भेट घेतली होती. त्याप्रसंगी शिवसेना लोकसभा संपर्कप्रमुख जाधव यांनी खासदार राऊतांकडे मागणी केली होती. यावेळी खासदार राऊत यांनी सकारात्मक भूमिका घेत पक्षप्रमुखांकडे मागणी करणार असल्याचे सांगितले. जाधव यांनी मुंबई येथे मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मागणी केली असता त्यांनीही या बाबीला सकारात्मक उत्तर देत लवकरच निर्णय कळवला जाईल असे सांगितले. यावेळी इगतपुरीचे तालुकाप्रमुख राजेंद्र नाठे आदी उपस्थित होते.