मनोज जरांगे पाटील यांची मोर्चेबांधणीला सुरुवात:विधानसभा निवडणुकीची चर्चा करण्यासाठी पुण्यात महत्त्वाची बैठक
विधानसभा निवडणुकीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. आज त्यांनी पुण्यात या संदर्भात चर्चा करण्यासाठी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ते आज 21 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थिती नोंदवली. दरम्यान मनोज जरांगे पाटिल यांनी श्री. क्षेत्र आदमापूर येथे संत बाळूमामा यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. आपल्या दौऱ्यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी विविध मंदिरांना भेटी दिल्या, तसेच आशीर्वाद घेतले. मराठवाडा आणि विदर्भानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केले असून त्यांनी पुण्यातील विविध ठिकाणी भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. देवेंद्र फडणवीस आमचे शत्रू नाहीत. त्यांच्याबद्दल आमच्या मनात वाईट भावनाही नाहीत. पण त्यांच्या मराठाद्वेषी वागण्यामुळे भाजपमधील मराठा आमदारही त्यांच्यावर नाराज आहेत. त्यांच्या मनात फडणवीसांविषयी खदखद आहे. माझ्या आजूबाजूला मीडियावाले नसताना हे आमदार मला येऊन भेटतात, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. विधानसभेला मविआ, महायुतीच्या नाराज इच्छुकांना सोबत घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. भीमाशंकरला जाण्यापूर्वी ते माध्यमांशी बोलत होते. सोमवारी भीमाशंकर मंदिरात घेतले दर्शन राजकारण उघडे केल्याशिवाय राहणार नाही या वेळी मनोज जरांगे म्हणाले की, भाजपचे आजी-माजी आमदार मला येऊन भेटतात. मराठा आमदारांना वेळ न देणे, त्यांचे प्रश्न ऐकून न घेणे यामुळे आमदारांमध्ये प्रचंड खदखद आहे. फडणवीसांकडे इतर पक्षांच्या आमदारांना भेटायला वेळ आहे, पण मराठा समाजाच्या आमदारांना ते भेटत नाहीत. भाजपमधील मराठा आमदारांनाच आमच्या अंगावर सोडण्याचे काम फडणवीसांनी केले आहे. आमचेच लोक आमच्या अंगावर घालून आरक्षण देणार नसाल तर मात्र तुमचे राजकारण उघडे केल्याशिवाय राहणार नाही. समाज उमेदवार ठरवेल जरांगे म्हणाले की, विधानसभेसाठी अनेक इच्छुक मला येऊन भेटत आहेत. पण मी महायुती व मविआतील कोणत्याही नाराज नेत्याला आमच्यासोबत घेणार नाही. तसे केले तर आमच्यातील इच्छुकांचा प्रश्न उपस्थित होईल. आम्ही निवडलेल्या उमेदवारांची नावे समाजापुढे ठेवली जातील. समाज योग्य तो निर्णय घेईल. आमची एकजूट असल्यामुळे कुणीही कुणाचे पाय खेचणार नाही. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… महामहोपाध्याय फडणवीसकृत शिवरायांचा नवा अपमान:थेट हल्ला करत ठाकरे गटाकडून फडणवीसांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न मोगलांच्या आर्थिक नाड्या तोडण्यासाठी सुरत लुटायला हवी हे महाराजांचे धोरण होते व त्यानुसार सुरतवर स्वारी करून महाराजांनी दाणादाण उडवली, हे ऐतिहासिक सत्य असताना महामहोपाध्याय फडणवीस शिवरायांचा नवा इतिहास मांडून काय साध्य करीत आहेत? असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे गटाच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार करण्यात आला आहे. पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामानाच्या माध्यमातून ठाकरे गटाने फडणवीसांवर निशाणा साधला आहे. पूर्ण बातमी वाचा…