नवी दिल्ली : भारतीय लोकांमध्ये सोन्याची भरपूर मागणी असते. सण-उत्सव असो किंवा घरी लग्नसराई सोने खरेदीला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. भारतीयांसाठी सोने फक्त एक अलंकार नसून बचत आहे. भारतातील लोक सोन्याकडे दागिन्यांपेक्षा अधिक गुंतवणूक म्हणून पाहतात. अडचणीच्या काळात सोन्यातील गुंतवणूक केव्हाही उपयोगी पडू शकते. कधी अशी आर्थिक अडचण आली तर काही तासांतच घराच्या तिजोरीत बंद सोन्याचे दागिने आपत्कालीन फंड म्हणून तुमच्यासाठी तयार असतात. सोन्याचे दागिने विकून लोकांना सूट मिळत होती, पण आता असे होणार नाही. सरकारने सोन्याचे दागिने खरेदीपासून विक्रीपर्यंतचे सर्व नियम बदलले आहेत.

Gold Buying: ​सोने खरेदी करताय? थांबा, घाई करू नका! आधी नियम समजून घ्या, अन्यथा…
सोने विक्रीचा नियम बदलला
इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार १ एप्रिल म्हणजे नवीन आर्थिक वर्षापासून सरकारने सोन्याचे दागिने विकण्यासाठी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर किंवा ६ अंकी HUID अनिवार्य केला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर आता सोने विक्रीसाठी हॉलमार्किंग आवश्यक झाले असून केंद्र सरकारने आता जुन्या सोन्याच्या दागिन्यांसाठीही विशेष नियम घालून दिला आहे. नवीन नियमामुळे आता ग्राहक HUID क्रमांकाशिवाय दागिने विक्री करू शकणार नाही.

घरात सोन्याचे दागिने आहेत का? लवकर बाहेर काढा, हॉलमार्क नसलेले दागिने विक्रीचा नियम बदलला
नियम लागू नंतर काय करायचे?
वरील नियम लागू झाल्यावर ग्राहकांची डोकेदुखी नक्कीच वाढली असेल, पण तुम्ही हॉलमार्किंगचा नियम लागू होण्यापूर्वी सोन्याचे दागिने बनवले असतील आणि आता ते विकायचे किंवा बदलायचे असतील, तर तुम्ही ते करू शकणार नाही. जुने सोन्याचे दागिने किंवा सोन्याच्या इतर उत्पादनांची विक्री करण्यापूर्वी तुम्हाला त्यांना हॉलमार्क करणे आवश्यक आहे.

काय होईल फायदा
गोल्ड हॉलमार्किंग शुद्ध सोन्याचे वैशिष्ट्य आहे. हॉलमार्क पाहून सोने किती शुद्ध आहे, हे समजते. जुन्या दागिन्यांवर हॉलमार्क करून तुम्हाला तुमच्या जुन्या सोन्याच्या दागिन्यांची योग्य किंमत कुठे मिळेल, तसेच सोन्यात गुंतवणूक करून किती काळा पैसा दडवला गेला आहे हे ही सरकार शोधू शकेल.

या कारणांमुळे जगातली सर्वाधिक सोने खरेदी भारतात होते

HUID आवश्यक
१ एप्रिल २०२३ पासून सरकारने देशातील सर्व सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या उत्पादनांवर हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) अनिवार्य केले आहे. या युनिक नंबरद्वारे सोन्याच्या दागिन्यांमधील सोन्याची शुद्धता किती टक्के आहे, हे समजेल. आणि सोन्याच्या शुद्धतेबद्दल ज्वेलर्स तुम्हाला फसवू शकणार नाहीत. सोन्याच्या दागिन्यांवर भारतीय मानक ब्युरोचा (BIS) लोगो असेल.

हॉलमार्किंग कसे करायचे?
दरम्यान, जर तुमच्या सोन्यावर आधीपासूनच हॉलमार्क असेल तर तुम्ही ते सहज विकू किंवा बदली करू शकता. पण जर तुमच्या दागिन्यांवर HUID चिन्ह नसेल तर तुम्हाला ते विकण्या किंवा बदली करण्यापूर्वी हॉलमार्क करून घ्यावे लागेल. जुन्या दागिन्यांमध्ये हॉलमार्किंग कसे करावे याबाबतही नियम असून यासाठी तुम्हाला तुमचे जुने दागिने BIS नोंदणीकृत ज्वेलर्सकडे न्यावे लागतील. ज्वेलर्स दागिने BIS असेइंग आणि हॉलमार्किंग सेंटरमध्ये घेऊन जातील, जिथे दागिन्यांची शुद्धता तपासल्यानंतर त्यावर हॉलमार्क केले जाईल. याशिवाय तुम्ही स्वतः देखील हॉलमार्किंग सेंटरमध्ये जाऊनही हॉलमार्क करू शकता. जुन्या दागिन्यांच्या हॉलमार्किंगसाठी तुम्हाला प्रत्येक तुकड्यासाठी फक्त ४५ रुपये शुल्क भरावे लागेल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *