भाजपमधून उमेदवार आयात करून उद्धव सेना लढवणार निवडणूक:निष्ठावंतांची खदखद पक्षासमोर ठरणार आव्हान
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरउद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत भाजपमधूनउमेदवारांना आयात करण्यात येत आहे.यापूर्वी पश्चिम मतदारसंघात भाजपच्या राजूशिंदे यांना घेण्यात आले. त्यानंतरवैजापूरमध्ये भाजपच्या दिनेश परदेशी यांचाप्रवेश मातोश्रीवर करण्यात आला. त्यामुळेभाजपच्या नेत्यांना शिवसेनेत घेऊन त्यांनाउमेदवारी दिली जाणार अशी चर्चाशिवसेनेत सुरू झाली आहे. त्यामुळेनिष्ठावंतांना संधी मिळणार की नाही याबाबतचर्चा सुरू झाली आहे.
सहा जागांवर उबाठाची तयारी
महाविकास आघाडीत उबाठा गटाने सहामतदारसंघांसाठी आग्रह धरल्याची चर्चा आहे. त्यातशहरातील पश्चिम व मध्य तर ग्रामीणमधील कन्नड,सिल्लोड, गंगापूर आणि पैठण यात उमेदवारनिश्चितीकडे वाटचाल सुरू केली आहे. पश्चिम ववैजापूर यात उमेदवार आयात करण्यात आलेआहेत, तर कन्नडमध्ये उदयसिंग राजपूत हे उबाठाचेआमदार आहेत. सिल्लोड व मध्य मतदारसंघाबाबतमात्र अजून उबाठा गटाकडून कुठलीही हालचालदिसत नाही. सिल्लोडमध्ये उमेदवार आयातकरायची चर्चा आहे. मात्र मध्य मतदारसंघातपक्षातील तीन प्रमुख दावेदार आहेत.
पक्षासमोर निष्ठावंतांचेअसेल मोठे आव्हान
शिवसेनेत बंड झाल्यानंतर सर्वाधिकफटका छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातबसला. सहापैकी पाच आमदारठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेंच्याशिवसेनेत सहभागी झाले. मात्र आताया आमदारांना पाडण्यासाठीशिवसेनेकडून भाजपच्या नेत्यांनापक्षात घेण्याचे सत्र सुरू झाले आहे.त्यामुळे निष्ठावंतांच्या मनातीलखदखद ही पक्षासमोर मोठे आव्हानठरणार आहे.
निष्ठावंतांना उमेदवारी मिळण्याची आशा
पश्चिमचे तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाडम्हणाले, शिवसेनेत निष्ठावंतांना संधी मिळेल अशीआम्हाला आशा आहे. आम्ही आमचे काम करतआहोत. पक्षप्रमुख यावर निर्णय घेतील असे त्यांनीसांगितले. वैजापूरचे सचिन वाणी म्हणाले, मीवैजापूरमधून इच्छुक आहे. मात्र गद्दारांना पराभूत करणे हेआमचे ध्येय आहे. त्यासाठी निष्ठावंतांना काही काळथांबावे लागले तरी चालेल, अशी प्रतिक्रिया सचिनवाणी यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली. जिल्हाप्रमुखकिशनचंद तनवाणी म्हणाले, निष्ठावंतांचा विचारनक्कीच होईल. शिवसेनेच्या परंपरेनुसार अंतिम निर्णयपक्षप्रमुख घेतील आणि तो सगळ्यांना मान्य असेल. आगामी काळात आम्ही त्यांचे नेते फोडू : अंबादास दानवे
भाजपचे नेते जर आमचेकार्यकर्ते फोडत असतील तरआगामी काळात भाजपचेनेतेही फोडले जातील.भाजपची अवस्था किती वाईटझाली हे यातून पाहायलामिळते. महाविकास आघाडीत जागावाटपाचीप्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. लवकरचघोषणा करू. -अंबादास दानवे , विरोधी पक्षनेते