पुण्यातील कारखान्यात भीषण अपघात:काचेच्या पेटीखाली दबून चौघांचा दुर्दैवी मृत्यू
पुणे शहरातील येवलेवाडी येथील कारखान्यात मोठी दुर्घटना घडली असून यात चौघांचा मृत्यू झाला आहे. येवलेवाडी येथील काचेच्या कारखान्यात गाडीतून काचा उतरवताना काचेच्या पेटीखाली काही कामगार दबले गेले. यात चार कामगारांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेले चारही कामगार उत्तर प्रदेशातील रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्याच्या येवलेवाडी येथील इंडिया ग्लास या काचेच्या कंपनीत ही दुर्घटना घडली. दुपारी दीडच्या सुमारास काचेचा माल उतरवत असताना काचा फुटल्या. काचेच्या पेटीखाली काही कामगार अडकले असल्याची माहिती येथील कोंढवा भागातील अग्निशामक दलाला मिळाली होती. त्यानुसार अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी दाखल होताच अग्निशामक दलाच्या जवानांनी बचावकार्य सुरू केले. यावेळी सहा कामगार काचेच्या पेटीखाली दबले गेले होते. यातील सर्व कामगारांना बाहेर काढले. मात्र यातील चार जण गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. या घटनेची माहिती देताना अग्निशमन विभागातील कोंढवा स्टेशन अधिकारी समीर शेख यांनी सांगितले, रविवारी दुपारच्या सुमारास येवलेवाडी भागात दुर्घटनेची माहिती आम्हाला मिळाली होती. काही लोक काचेच्या पेटीखाली दबले गेले होते. त्या पेट्यांचे वजन जवळपास दोन ते अडीच टन इतके होते. एवढ्या वजनाच्या पेटीखाली दाबल्याने चौघांचा मृत्यू झाला. येथील कारखान्यात काम करणारे पवन रामचंद्र कुमार (40), धर्मेंद्र सत्यपाल कुमार (40), विकास प्रसाद गौतम (23), अमित शिवशंकर कुमार (27) या चार कामगारांचा मृत्यू झाला. हे सर्व कामगार उत्तर प्रदेसग येथील रहिवाशी होते. तसेच मानेसर कोळी (31) आणि जगतपाल संतराम कुमार (41) हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.