आसाममध्ये 65 तासांनंतर एक मृतदेह सापडला:खाणीत 250 मी. लांब, 3 फूट रुंदबोगद्याचा चक्रव्यूह; 8 जीव धोक्यात
आसाममधील दिमा हासाओ जिल्ह्यातील तीन किलो परिसरात तयार केलेल्या कोळसा खाणीत ८ जीव वाचवण्याची धडपड सुरू आहे. खाणीबाहेर दिवसभर त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना सुरू होत्या. मात्र, सकाळी ९ वाजता एनडीआरएफ आणि लष्कराच्या २१ पॅरा डायव्हर्सना खाणीत १०० फूट पाण्यात एका मजुराचा मृतदेह सापडला. त्यांनी तो बाहेर काढला, मात्र त्याची ओळख पटू शकली नाही. सोमवारी सकाळी ८ वाजेपासून उर्वरित कामगार (रॅट मायनर्स) ३४० फूट खोल खाणीत अडकले आहेत. ते खाणीच्या कोणत्या भागात आहेत हे शोधण्यासाठी लष्कर आणि नौदलाकडून विशेष रोबोटिक उपकरणे खाणीत पाठवण्यात आली आहेत. बचावकार्यात सहभागी असलेले एनडीआरएफचे डेप्युटी कमांडंट एनके तिवारी यांनी भास्करला सांगितले की, पहिल्यांदाच अशा प्रकारची स्थिती निर्माण झाल्याने आम्ही लोकांना वाचवण्यासाठी आलो आहोत. हे खूप आव्हानात्मक आहे. बुधवारी आर्मी आणि एनडीआरएफच्या पाणबुड्यांचे पथक सहा वेळा खाली उतरले. परंतु, आमचे पाणबुडे पाण्यात ३५ ते ४० फुटांपेक्षा जास्त खाली जाऊ शकले नाहीत. कारण खाली पाण्याची घनता जास्त आहे आणि पृष्ठभाग अनेक फूट काळा ढिगारा साचलेला आहे. नौदलाचे १२ पाणबुडे अशा ऑपरेशन्समध्ये तज्ज्ञ आहेत. त्यांच्याकडे उच्च-तंत्रज्ञान सोनार इमेजिंग उपकरणे आहेत, परंतु ते ढिगाऱ्याच्या आत छायाचित्रे घेण्यास सक्षम नाहीत. नौदलाने संध्याकाळी रिमोट ऑपरेटेड व्हेइकल (आरओबी) पाण्यात पाठवले, ज्याने आतील काही छायाचित्रे पाठवली. खाणीच्या भिंतींत अनेक बोगदे असल्याचे दिसून येते, जे या रॅट मायनर्स अर्थात कामगारांनी खोदलेले आहेत. हे बोगदे २५० मीटर लांब आणि ३ फूट रुंदीपर्यंतचे आहेत. ज्या बोगद्यांमधून पाणी वाहत आहे तिकडे कोणालाही पाठवलेले नाही.
पथक सहा वेळा खाली उतरले. परंतु, आमचे पाणबुडे पाण्यात ३५ ते ४० फुटांपेक्षा जास्त खाली जाऊ शकले नाहीत. कारण खाली पाण्याची घनता जास्त आहे आणि पृष्ठभाग अनेक फूट काळा ढिगारा साचलेला आहे. नौदलाचे १२ पाणबुडे अशा ऑपरेशन्समध्ये तज्ज्ञ आहेत. त्यांच्याकडे उच्च-तंत्रज्ञान सोनार इमेजिंग उपकरणे आहेत, परंतु ते ढिगाऱ्याच्या आत छायाचित्रे घेण्यास सक्षम नाहीत. २४ तास ऑपरेशन सुरू, ओएनजीसीने पाठवला पंप घटनास्थळावरील एक अधिकारी म्हणाला, ऑपरेशन २४ तास सुरू आहे. तथापि, परिस्थिती पाहता उर्वरित कामगारांची जगण्याची शक्यता कमी आहे, कारण जर ते बोगद्यात असतील तर तेसुद्धा पाण्याने भरलेले आहेत. ओएनजीसीने पाणी बाहेर काढण्यासाठी एमआय-१७ हेलिकॉप्टरमधून उच्च शक्तीचा पंपही पाठवला आहे.