बिहारमधील विषाणू परळीत आला:त्याने भस्मासुरालाही मागे टाकले – सदाभाऊ खोत, म्हणाले – देशमुखांची हत्या करणाऱ्यांना ठेचून मारले पाहिजे
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून राज्यात वादंग उठले आहे. या प्रकरणावरून राज्यातील सरपंच परिषदही आक्रमक झाली आहे. सरपंच परिषदेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना सदाभाऊ खोत यांनी परळीची तुलना बिहारसोबत केली. बिहारमधील विषाणू परळीत आला असून त्याने भस्मासुरालाही मागे टाकले, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली. देशमुखांच्या मारेकऱ्यांना ठेचून मारले पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. सरपंच परिषदेच्या वतीने संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मुंबइतील आझाद मैदान येथे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी संतोष देशमुखांच्या आरोपींवर कारवाई करण्यासह देशमुख यांच्या पत्नीला शासकीय नोकरी आणि 50 लाखांची मदत, सरपंच उपसरपंच यांना 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची परवानगी द्यावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनात सदाभाऊ खोत आणि भाजप आमदार सुरेश धस सहभागी झाले होते. काय म्हणाले सदाभाऊ खोत?
सदाभाऊ खोत यांनी यावेळी बोलताना परळी मतदारसंघाची तुलना बिहारसोबत केली. बीड येथील घटना मानवतेला काळीमा फासणारी असून या घटनेमुळे परळी मतदारसंघाने बिहारला सुद्धा मागे टाकले आहे, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली. बिहार आता सुधारण्याच्या वाटेवर आहे. परंतु, बिहारमधला विषाणू परळीमध्ये आला, असा टोलाही त्यांनी लगावला. हत्या करणाऱ्यांना ठेचून मारले पाहिजे परळीत आलेला हा विषाणू एवढा भयानक वाढलेला आहे की, त्याने भस्मासुराला मागे टाकले आहे, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली. संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्यांना ठेचून मारले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी बोलताना केली. संतोष देशमुख यांच्या हत्येमागच्या सूत्रधारांचा शोध घेणे गरजेचे असल्याची भावना महाराष्ट्रातील जनतेची आहे, असेही ते म्हणाले. हे ही वाचा… बीडच्या आरोपींचा ‘तेरे नाम’मधील सलमान झाला पाहिजे:त्यांच्यावर मोक्का लावा, एकटे पडू द्या; सुरेश धसांचा सरपंच परिषदेतून हल्लाबोल संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सरपंच परिषद आक्रमक झाली आहे. राज्यातील सरपंच मुंबईतील आझाद मैदान येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करत आहेत. या आंदोलनात भाजप आमदार सुरेश धस यांनीही सहभाग घेतला. यावेळी बोलताना त्यांनी बीड प्रकरणातील आरोपींवर मोक्का लावण्याची मागणी केली. शिवाय त्यांची अवस्था तेरे नाम सारखी झाली पाहिजे, असेही ते म्हणाले. सविस्तर वाचा… बीडचे राजकीय पर्यावरण लवकरच बदलेल:मंत्री पंकजा मुंडे यांचे सूचक विधान; बंधू धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर भाष्य करण्यास नकार राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडचे राजकीय पर्यावरण लवकरच दुरुस्त होणार असल्याचे महत्त्वपूर्ण विधान केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे मिळून बीडमधील परिस्थिती सुधारतील. त्यानंतर तेथील राजकीय पर्यावरण लवकरच बदलेल, असे त्या म्हणाल्यात. त्यांच्या या विधानाचे विविध अर्थ काढले जात आहेत. दरम्यान, पंकजा यांनी यावेळी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर भाष्य करण्यासही नकार दिला. सविस्तर वाचा…