जळगाव, जामनेरात किशोरी ठरल्या वासनेच्या बळी तर दोघींचा विनयभंग:दाेन घटनांमधील दाेन्ही आराेपींना अटक

बदलापूरपाठोपाठ नंदुरबार आणि आता जळगाव जिल्हा बलात्काराच्या घटनांनी सुन्न झाला आहे. बुधवारी जळगाव शहरासह जामनेर तालुक्यात किशाेरवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची फिर्याद नोंदवली गेली. जळगावातच दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंगही करण्यात आल्यामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. जळगावात मुलाच्या मैत्रीणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमावर १६ दिवसांनी गुन्हा दाखल झाला. गुरुवारी रात्री आरोपीला मुंबईत अटक करण्यात आले. आपल्या मुलासाेबत लपाछपी खेळणाऱ्या ११ वर्षीय मैत्रीणीवर नराधमाकडून अत्याचार
जळगाव | स्वत:च्या मुलासाेबत लपाछपी खेळताना खाेलीत लपण्यासाठी आलेल्या शेजारील ११ वर्षीय मुलीवर प्राैढाने अत्याचार केला. ही धक्कादायक घटना १२ ऑगस्ट राेेजी शहरातील महामार्गालगतच्या एका भागात घडली. पतीचे तीन महिन्यांपूर्वी निधन झाल्याने हाॅटेलमध्ये काम करणाऱ्या पीडित मुलीच्या आईला घरमालक कुटुंबीयांनी पाेलिसांत गेल्याने तुमची व आमच्या घराची बदनामी हाेईल, त्यापेक्षा आपापसात प्रकरण मिटवा, असा सल्ला दिल्याने घटनेच्या तब्बल १६ दिवसांनी पीडितेच्या मामाला घटना कळल्यावर रामानंद नगर पाेलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, घटनेच्या दुसऱ्याच दिवशी पसार झालेल्या संशयिताला पाेलिसांनी मुंबईत अटक केली असून त्याला पाेलिस जळगावात घेऊन येत आहेत.
पीडित अल्पवयीन मुलगी आई व दाेन वर्षाने माेठी असलेल्या बहिणीसह शहरातील महामार्गाजवळ असलेल्या एका मैदानाजवळील काॅलनीत शासकीय नाेकरीत असलेल्या कुटुंबाच्या दुमजली घरात भाड्याने एका खाेलीत राहते. पीडितेच्या वडिलांचे तीन महिन्यांपूर्वी आजारपणामुळे निधन झाल्याने तिची आई हाॅटेलमध्ये धुणे-भांडे व साफसफाई करून कुटुंब चालवते. १२ ऑगस्ट राेजी दुपारी ३ वाजता नेहमीप्रमाणे हाॅटेलवर कामासाठी गेली हाेती. संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास पीडिता शेजारी राहणारा सिद्धार्थ वानखेडे या मजुराच्या तिच्या एवढा मुलगा व त्याची लहान बहीण असे लपाछपी खेळत हाेते. तर पीडितेची माेठी बहीण किराणा दुकानावर साहित्य आणण्यासाठी गेली हाेती. खेळताना लपण्यासाठी पीडिता शेजारी वानखेडेच्या घरात लपण्यासाठी गेली. तेव्हा सिद्धार्थ हा एकटाच घरात हाेता. तर त्याची पत्नी कामावर गेली हाेती. त्याने पीडिता घरात आल्यावर घराचा दरवाजा लावून तिला पकडून कपडे काढून तिच्या गुप्तांगाशी खेळून अत्याचार केला. या घटनेने भेदरलेल्या पीडितेने संशयिताच्या हातावर नखांनी बाेचकारले. त्यानंतर सुटका करून घेत रडत शेजारील आपल्या घरात आली. रक्षाबंधनाला गेल्यावर कळली मामाला घटना घरमालक कुटुंबीय शासकीय नाेकरीत असून, आपल्याच समाजाचे आहेत म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवून पीडितेची आई चूप बसली. तिने दाेन्ही विवाहित मुली व शहरातील शिवाजीनगर भागात राहणाऱ्या भावालाही घटना कळवली नाही. घटनेच्या सात दिवसांनी पीडितेची आई दाेन्ही मुलींना साेबत घेऊन भावाकडे रक्षाबंधनासाठी गेली. त्यानंतर तिने पीडितेला मामाकडे काही दिवस रहा, असे सांगून माेठ्या मुलीसाेबत घरी परतली. दरम्यान, रात्री भाची झाेपत नसल्याचे लक्षात आल्याने मामाने पत्नीला पीडितेला एकट्यात विचार म्हणून सांगितल्यावर मामीने तिला दुसऱ्या खाेलीत नेऊन विचारणा केल्यावर पीडितेने सर्व घटना मामीला सांगितली. त्यानंतर मामाने दुसऱ्या दिवशी बहिणीकडे जाऊन पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास सांगितले. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार २८ ऑगस्ट राेजी रामानंदनगर पाेलिस ठाण्यात सिद्धार्थ वानखेडे याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ६३( बी), ६५ (२),७४, ७६, १२७(१),३५१(३) तसेच पाेक्साे कायदा २०१२ चे कलम ४,६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पुढील तपास सहायक पाेलिस निरीक्षक राेहिदास गभाले हे करीत आहेत. पीडिता चार बहिणीत सर्वात लहान पीडितेच्या आईला चार मुली असून, दाेन मुलींचे लग्न झाले आहे. तर पीडितेपेक्षा दाेन वर्षांनी माेठी बहीण ही घटनेच्या वेळी दुकानात सामान आणण्यासाठी गेली हाेती. चक्क पत्नीचाच पतीवर अविश्वास
संशयिताचे कुटुंब दाेन महिन्यांपासून या ठिकाणी राहण्यास आलेे. संशयित हा मजूर असून ताे दारू प्यायचा. त्याच्या पत्नीने पीडितेच्या आईला सुरुवातीलाच सांगितले होते की, तुम्ही नसताना तुमच्या मुलींना माझ्या घरात पाठवू नका. माझ्या नवऱ्यावर माझा विश्वास नाही. मी माझ्या मुलीला मी घरी नसताना त्याच्याजवळ जाऊ देत नाही. मुंबईतून संशयित आरोपी ताब्यात
बुधवारी गुन्हा दाखल झाल्यानंतर रामानंदनगर पाेलिस ठाण्याचे एक पथक संशयिताच्या मागावर लगेचच मुंबई रवाना झाले हाेते. या पथकाने संशयिताला ताब्यात घेतले असून गुरुवारी जळगावकडे येण्यास रवाना झाले आहेत. मामाने गुन्हा दाखल करण्यास पाडले भाग
शिवाजीनगर येथे राहणाऱ्या मामाकडे रक्षाबंधनासाठी भाची गेली होती. त्या वेळी ही घटना मामाला समजली. मामाने बहिणीला पोलिसांत फिर्याद देण्यास भाग पाडले.
कुटुंबही गायब
घटना घडल्यानंतर संशयित सिद्धार्थ वानखेडे हा लगेच फरार झाला. त्याची पत्नी व दाेन्ही मुले हे २६ ऑगस्टपासून घर साेडून निघून गेले.
शाळकरी मुलीला इशारा करणाऱ्याला अटक
शहरातील शनिपेठ हद्दीतील एका भागात राहणारी १५ वर्षीय मुलगी शाळेत जात असताना तिचा पाठलाग करणाऱ्या ताैफिक जब्बार बेलदार ( रा. मास्टर काॅलनी) याला अटक करण्यात आली.
दाेघांनी नऊवर्षीय मुलीला जवळ ओढून केला विनयभंग पिंप्राळा हुडकाेत राहणाऱ्या महिलेने मुलाला चिथावणी दिल्याने दाेन अल्पवयीन मुलांनी ९ वर्षीय मुलीचा विनयभंग केला. आराेपींनी दूध घेण्यास गेलेल्या मुलीसमाेर स्वत:चे कपडे काढून तिला जवळ ओढले.
शाैचास गेलेल्या मुलीवर अल्पवयीनाचा अत्याचार
जामनेर | डोहरी येथील अल्पवयीन मुलीवर शेजारीच रहिवासी असलेल्या अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याचा प्रकार चार दिवसांपूर्वी घडला. याबाबत बुधवारी जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी आरोपीस जामनेर न्यायालयात हजर केले असता त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. घराशेजारीच रहिवासी असलेल्या १६ वर्षीय युवतीवर समाजातीलच एका १७ वर्षीय तरुणाचा डोळा होता. चार दिवसांपूर्वी युवती गावालगतच्या केळी बागेत शौचास गेली असता अल्पवयीन आरोपीने तिचा पाठलाग करून तिच्यावर केळी बागेतच अत्याचार केला. याप्रकरणी पीडीतेच्या वडिलांनी बुधवारी जामनेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. वडिलांच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. गुरुवारी जामनेर न्यायालयात हजर केले असता त्याची बाल सुधारक गृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक दीपक रोठे यांनी दिली.

​बदलापूरपाठोपाठ नंदुरबार आणि आता जळगाव जिल्हा बलात्काराच्या घटनांनी सुन्न झाला आहे. बुधवारी जळगाव शहरासह जामनेर तालुक्यात किशाेरवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची फिर्याद नोंदवली गेली. जळगावातच दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंगही करण्यात आल्यामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. जळगावात मुलाच्या मैत्रीणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमावर १६ दिवसांनी गुन्हा दाखल झाला. गुरुवारी रात्री आरोपीला मुंबईत अटक करण्यात आले. आपल्या मुलासाेबत लपाछपी खेळणाऱ्या ११ वर्षीय मैत्रीणीवर नराधमाकडून अत्याचार

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment