जयपूर: राजस्थानात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सत्ताधारी काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी थेट राजस्थानात आहे. स्टार प्रचारकांच्या सभा, रॅलींना सुरुवात झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री मंगळवारी प्रचारासाठी राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात पोहोचले. त्यावेळी भाजपच्या प्रचार रथाची वरील भाग विजेच्या तारेच्या संपर्कात आला. सुदैवानं अमित शहा थोडक्यात बचावले.केंद्रीय मंत्री अमित शहांचा ताफा बिदियाद गावातून परबतसरच्या दिशेनं जात होता. एका गल्लीतून ताफा जात होता. गल्लीच्या दुतर्फा दुकानं आणि घरं होती. त्यावेळी रथाचा वरचा भाग तारेच्या संपर्कात आला. त्यामुळे स्पार्किंग झालं. विजेची तार रस्त्यावर पडली. त्यानंतर रथामागील अन्य वाहनं लगेचच थांबली. वीज पुरवठा तातडीनं खंडित करण्यात आला. त्यामुळे जीवितहानी टळली. घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.यानंतर अमित शहांना दुसऱ्या वाहनातून परबतसरला नेण्यात आलं. तिथे त्यांनी रॅलीला संबोधित केलं. या घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी जयपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना त्यांनी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती दिली. राजस्थानात २५ नोव्हेंबरला विधानसभेच्या २०० जागांसाठी एका टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबरला जाहीर होईल. याच दिवशी मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोरम विधानसभा निवडणुकांचा निकालही जाहीर करण्यात येतील. राजस्थानमध्ये काँग्रेस अशोक गेहलोत यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणुकीत उतरली आहे. तर भाजपनं अद्याप तरी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *