हिंगोलीत काँग्रेसच्या आढावा बैठकीत राडा:दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, पोलिसांना पाचारण

हिंगोलीत काँग्रेसच्या आढावा बैठकीत राडा:दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, पोलिसांना पाचारण

हिंगोली शहरात काँग्रेसच्या आढावा बैठकीमध्ये शनिवारी ता २१ रात्री दोन गटात राडा झाला असून कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीमुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. यावेळी पोलिसांना पाचारण केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली मात्र बैठकीमध्ये कुठलाही आढावा झाला नाही. काँग्रेसमधील दोन गट पुन्हा एकदा उघड झाले आहे. हिंगोली जिल्हा काँग्रेसमधील दोन गट मागील काही दिवसांपासून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. विधान परिषद सदस्य डॉक्टर प्रज्ञा सातव व माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांचे गट जिल्ह्याच्या राजकारणात चांगलेच चर्चेत आले आहेत. या दोन गटांमध्ये मनोमिलन करण्याचा प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून फोल ठरला आहे. दरम्यान आज हिंगोली येथे शिवाजीराव देशमुख सभागृहामध्ये काँग्रेसची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी काँग्रेस पक्षाचे मराठवाडा सह प्रभारी कुणाल चौधरी उपस्थित होते. यावेळी विधानपरिषद सदस्य डॉक्टर प्रज्ञा सातव, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई, माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान रात्री आठ वाजता सुरू झालेल्या या आढावा बैठकीपूर्वी सत्कार कार्यक्रम सुरू होताच काँग्रेसच्या दोन गटाकडून घोषणाबाजीला सुरुवात झाली. त्यातच काँग्रेसचे शहराध्यक्ष पवन उपाध्याय यांना सातव गटातील कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. त्यामुळे वातावरण चांगलेच पेटले. माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून संपूर्ण सभागृह डोक्यावर घेतले. कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला जात असताना कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांकडून दिल्या जाणाऱ्या मुर्दाबाद तसेच विजय असोच्या घोषणांमुळे परिस्थिती चांगली तणावपूर्ण बनली. कुणीही कोणाच्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. या परिस्थितीत वातावरण तणावपूर्ण झाल्याने तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले. हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जमावाला बाजूला करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या गोंधळाच्या परिस्थितीत नेत्यांनी मात्र घटनास्थळावरून काढता पाय घेतला. त्यामुळे आढावा बैठक पूर्ण झालीच नाही. दरम्यान या घटनेमुळे काँग्रेस मधील दोन गट पुन्हा एकदा उघड झाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस मधील गटबाजी चव्हाट्यावर आल्याने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. या संदर्भात काँग्रेसचे शहराध्यक्ष पवन उपाध्याय यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी धक्काबुक्की झाल्याच्या प्रकाराला दुजोरा दिला. या प्रकारात आपण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे ही तक्रार करणार असून पोलीस ठाण्यामध्ये ही तक्रार देण्यासाठी जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

​हिंगोली शहरात काँग्रेसच्या आढावा बैठकीमध्ये शनिवारी ता २१ रात्री दोन गटात राडा झाला असून कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीमुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. यावेळी पोलिसांना पाचारण केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली मात्र बैठकीमध्ये कुठलाही आढावा झाला नाही. काँग्रेसमधील दोन गट पुन्हा एकदा उघड झाले आहे. हिंगोली जिल्हा काँग्रेसमधील दोन गट मागील काही दिवसांपासून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. विधान परिषद सदस्य डॉक्टर प्रज्ञा सातव व माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांचे गट जिल्ह्याच्या राजकारणात चांगलेच चर्चेत आले आहेत. या दोन गटांमध्ये मनोमिलन करण्याचा प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून फोल ठरला आहे. दरम्यान आज हिंगोली येथे शिवाजीराव देशमुख सभागृहामध्ये काँग्रेसची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी काँग्रेस पक्षाचे मराठवाडा सह प्रभारी कुणाल चौधरी उपस्थित होते. यावेळी विधानपरिषद सदस्य डॉक्टर प्रज्ञा सातव, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई, माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान रात्री आठ वाजता सुरू झालेल्या या आढावा बैठकीपूर्वी सत्कार कार्यक्रम सुरू होताच काँग्रेसच्या दोन गटाकडून घोषणाबाजीला सुरुवात झाली. त्यातच काँग्रेसचे शहराध्यक्ष पवन उपाध्याय यांना सातव गटातील कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. त्यामुळे वातावरण चांगलेच पेटले. माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून संपूर्ण सभागृह डोक्यावर घेतले. कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला जात असताना कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांकडून दिल्या जाणाऱ्या मुर्दाबाद तसेच विजय असोच्या घोषणांमुळे परिस्थिती चांगली तणावपूर्ण बनली. कुणीही कोणाच्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. या परिस्थितीत वातावरण तणावपूर्ण झाल्याने तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले. हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जमावाला बाजूला करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या गोंधळाच्या परिस्थितीत नेत्यांनी मात्र घटनास्थळावरून काढता पाय घेतला. त्यामुळे आढावा बैठक पूर्ण झालीच नाही. दरम्यान या घटनेमुळे काँग्रेस मधील दोन गट पुन्हा एकदा उघड झाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस मधील गटबाजी चव्हाट्यावर आल्याने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. या संदर्भात काँग्रेसचे शहराध्यक्ष पवन उपाध्याय यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी धक्काबुक्की झाल्याच्या प्रकाराला दुजोरा दिला. या प्रकारात आपण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे ही तक्रार करणार असून पोलीस ठाण्यामध्ये ही तक्रार देण्यासाठी जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment