राज्यात भाजपचाच मुख्यमंत्री, तर दोन पक्षांचे दोन उपमुख्यमंत्री:अजित पवारांची स्पष्टच सांगितला बैठकीतील निर्णय; कॅबिनेटच नाही तर राज्यमंत्र्यांच्या नावाचीही घोषणा होणार
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून सात दिवस झाले असले तरी अद्याप राज्यात सरकार स्थापन झालेले नाही. त्यामुळे अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. मात्र अजित पवार यांनी आता याबाबतच्या सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देत भाजपसोबत झालेल्या चर्चेचा सविस्तर तपशील सांगितला आहे. राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याचे आमच्या बैठकीत निश्चित झाले असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. तसेच उर्वरित दोन पक्षाचे दोन उपमुख्यमंत्री असतील, हे देखील निश्चित झाले असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. एवढेच नाही तर राज्यात सरकार स्थापन होईल, त्याचवेळी राज्य मंत्री पदांच्या नावाची देखील घोषणा करणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. या माध्यमातून राज्य सरकार स्थापनेची सर्व चर्चा पूर्ण झाली असल्याचे संकेत अजित पवार यांनी दिले आहेत. मात्र भाजपचा मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय हा भारतीय जनता पक्ष घेणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत याबाबत निर्णय होईल. त्यानंतर सरकार स्थापन केले जाईल, असे देखील पवारांनी सांगितले. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही राज्यासाठी ज्या योजना आखण्याचा विचार केला आहे, त्या योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू, असे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे. राज्यात कोणाचे सरकार असेल आणि कोण मुख्यमंत्री असेल याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. भारतीय जनता पक्षाच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांचे नाव अंतिम झाले असल्याची माहिती देखील समोर आली आहे. यासंबंधी दैनिक दिव्य मराठीने वृत्त दिले आहे. त्यातच आता अजित पवार यांच्याकडून देखील भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री असेल, हे स्पष्ट करण्यात आले आहे. सरकारचा शपथविधी कधी? याविषयी अजित पवार यांनी सविस्तर बोलणे टाळले. मात्र, दिव्य मराठीच्या वृत्तानुसार देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पाच डिसेंबर रोजी आझाद मैदान येथे दुपारी एक वाजता होणार असल्याची माहिती माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… महाराष्ट्राच्या CM पदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी:5 डिसेंबर रोजी 1 वाजता आझाद मैदानावर शपथविधी; BJPच्या ज्येष्ठ नेत्याची माहिती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचीच वर्णी लागणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षातील एका ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्र्यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी 5 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता आझाद मैदानावर होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. या संदर्भात सर्व तयारी ही पूर्ण झाली असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. पूर्ण बामती वाचा….