अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ॲक्टिव्ह मोडवर:तातडीच्या उपाय-योजना करण्याच्या प्रशासनाला सूचना, तातडीने मदत देण्याचा प्रयत्न
आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास सुरु ठेवून याद्वारे मदत आणि पुनर्वसनाचे सनियंत्रण ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार ॲक्टिव्ह मोडवर आल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्र्यांनी कालच प्रशासनाची बैठक घेतली होती तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनीही परभणी येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जात परिस्थितीची पाहणी केली. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला अनेक महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. राज्यात यंदा सर्वदूर दमदार पाऊस होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत 39 टक्के अधिक पाऊस झाला आहे. राज्यातील सर्व महसूली विभागांनी आतापर्यंत पावसाची सरासरी ओलांडली असून सर्वाधिक 131.8 टक्के पाऊस मराठवाडा विभागामध्ये झाला आहे. दुष्काळी प्रदेश म्हणून ओळख असलेल्या मराठवाड्यात यंदा, गतवर्षीच्या तुलनेत दीडपटी पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून दमदार पावसाचे सातत्य आहे. या हंगामात वार्षिक सरासरीमध्ये आतापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद मराठवाडा विभागात झाली आहे. त्या खालोखाल अमरावती विभागाची व त्यानंतर नागपूर विभागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिलेले निर्देश पहा….