कल्याण : एका शिपिंग कंपनीत डेस्क मॅनेजर म्हणून नोकरी करणाऱ्या २६ वर्षीय तरुणाचे युक्रेनमध्ये राहणाऱ्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. मात्र पत्नाच्या विरोधानंतरही पती तिला न सांगता गुपचूप युक्रेनला गेला. हे कळल्यानंतर २५ वर्षीय पत्नीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी कल्याणमधील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात पतीवर गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच युक्रेनमधून परतलेल्या आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. नितीश नायर असे अटक झालेल्या आरोपी पतीचे नाव आहे. तो कल्याण (पूर्व) येथील काटेमानिवली परिसरात राहणारा आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेच्या वडिलांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी नितीशवर माझ्या मुलीचे प्रेम होते. त्यामुळे दोघांचा प्रेमविवाह २०२० मध्ये झाला होता. दोन वर्ष सुखाने संसार सुरू असतानाच, सप्टेंबर महिन्यात तरुणीला काही माहिती मिळाली. त्यावरुन आपला पती नितीशचे युक्रेनमधील एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय तिला आला होता.

पन्नाशीत प्रियकर, २२ वर्षांची प्रेयसी; चॅटिंगमुळे पत्नीसमोर भांडाफोड, तुटणारा संसार असा सावरला
याशिवाय तिच्या पतीचे त्या महिलेसोबतचे काही फोटोही तिला मोबाईलमध्ये दिसल्याने संशय अधिकच बळावला होता. त्यातच कुटुंबीयांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, तरुणीला पतीच्या अफेअरबद्दल कळल्यानंतर तिने त्यांच्या नात्याला विरोध केला होता आणि भविष्यात युक्रेनला न जाण्याचा इशारा पतीला दिला होता.

शेअर बाजारात २२ लाख बुडाले, कर्जबाजारी पोलिसाच्या घरफोड्या, एका गोष्टीने जाळ्यात सापडला
८ नोव्हेंबरला नितीशने आपल्या पत्नीला सांगितले की तो काही कामासाठी बीकेसी येथील त्याच्या कार्यालयात जात आहे. पण त्याऐवजी तो युक्रेनला गेला आणि तिथून त्याने पत्नीला मेसेज केला की, मी युक्रेनला पोहोचलो असून मी परत येणार नाही, तसेच तू मला विसरून जा, दुसरा मार्ग निवडावा, असा मेसेज आरोपी पतीने पाठवल्यामुळे पत्नी नैराश्यात गेली होती, त्यानंतर तिला खूप मानसिक आघात झाला आणि १० नोव्हेंबर रोजी दिवाळी सणाच्या तोंडावरच तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

अश्लील व्हिडिओवरुन ब्लॅकमेल, खंडणीखोर कृषी अधिकारी महिला लेकासह अटकेत, घरी १९ लाखांचं घबाड
या प्रकरणाचा तपास करणार्‍या कोळसेवाडी पोलिसांना काही माहिती मिळाली. आत्महत्या करण्यापूर्वी तिने काही मित्रांना मेसेज करून आत्महत्या करणार असल्याची माहिती दिल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. शिवाय तरुणीने तिच्या आईला पतीकडून होणाऱ्या छळाची माहिती दिली होती. तसेच गुरुवारी तिचा पती नितीश मायदेशी परतला आणि परत आल्याची माहिती मिळताच त्याला त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली.

पती पत्नीनं बनावट स्क्रीनशॉटद्वारे तब्बल ४०० जणांना घातला गंडा, सापळा रचून पोलिसांनी केली अटक

दुसरीकडे आरोपी पती नितीशला अटक केल्यानंतर मृत पत्नीचे कुटुंबीय त्यांच्या मुलीचा जीव घेतल्याबद्दल त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी करत आहेत.

Read Latest Thane Updates And Marathi NewsSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *