शेतकऱ्याची नापिकी अन् कर्जामुळे गळफास घेऊन आत्महत्या:औंढा नागनाथच्या लोहरा खुर्दमधील घटना
औंढा नागनाथ तालुक्यातील लोहरा खुर्द येथे नापिकी व बँकेच्या कर्जामुळे अल्पभुधारक शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. 5 रात्री उशीरा अकस्मात मृ्त्यूची नोंद झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोहरा खुर्द येथील शेतकरी गणेश रामा राठोड (48) यांना लोहरा खुर्द शिवारात दोन एकर शेती आहे. या शेतीवरच त्यांचे 12 जणांचे कुटुंब उदरनिर्वाह करीत होते. शेती व रोजमजूरीवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. रोजमजूरीनंतर ते ऊसतोडीच्या कामावरही जात होते. दरम्यान, औंढा नागनाथ भारतीय स्टेट बँकेकडून त्यांनी 60 हजार रुपयांचे पिककर्ज घेतले होते. मात्र मागील काही वर्षापासून होणारी नापिकीमुळे कर्ज कसे फेडावे याची चिंता त्यांना लागली होती. त्यामुळे मागील काही दिवासंपासून ते अस्वस्थ होते. यावर्षी त्यांनी शेतात कापूस लागवड केली होती. मात्र अतिवृष्टी तर कधी पावसाच्या उघडीपीमुळे कापसाच्या पिकाचेही नुकसान झाले. त्यामुळे आता यावर्षीही कर्ज फेडता येणार नसल्याने ते चिंताग्रस्त झाले होते. दरम्यान, नापिकी व कर्जामुळे त्यांनी शेतात जाऊन गळफास घेतला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी शेतात पाहणी केली असता गणेश यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे निरीक्षक जी. एस. राहिरे, उपनिरीक्षक किशोर पोटे, जमादार घुगे, राजेश ठाकुर यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी संतोष राठोड यांनी दिलेल्या माहितीवरून औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. 5 रात्री उशीरा अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. जमादार घुगे पुढील तपास करीत आहेत.