मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने काही दिवसांपूर्वीच राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला. मात्र, नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात एकूण ३१२ गावांमध्ये, तर ९३९ वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या अहवालातून समोर आले आहे. गेल्या महिन्यात हा आकडा ३०५ गावे आणि ८९७ वाडा असा नोंदविण्यात आला होता.राज्यातील अनेक गावे आणि वाड्यांमधील पाणीटंचाईचा प्रश्न आता कठीण झाला आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात टँकरने पाणीपुरवठा होणाऱ्या गावांची आणि वाड्यांची संख्या वाढलेली असल्याचे अहवालातून दिसून आले आहे.राज्य सरकारच्या पाणीपुरवठा विभागाने नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्याचा टँकरने पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या गावांची आणि वाड्यांची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार राज्यात सध्याच्या घडीला ३२२ टँकर्सच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. यात ३८ सरकारी आणि २८४ खासगी टँकरचा समावेश आहे. मुख्य म्हणजे, गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यात कुठेही टँकरने पाणीपुरवठा केला जात नसल्याची माहिती समोर आली आहे.राज्यात सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक वाड्यांमध्ये सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याचे या आकडेवारीतून दिसते. सध्या सांगलीतील २७१ वाड्यांमध्ये, तर ३२ केला जात आहे. त्यापाठोपाठ सातारा जिल्ह्यात २६८ वाड्यांमध्ये आणि ६३ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नाशिकमधील २३६ वाड्यांमध्ये आणि १०६ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत आहे. नाशिकमध्ये सर्वाधिक टँकरची संख्या नोंदविण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण ९८ टँकर्सच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात असून, त्यात ९३ खासगी आणि पाच सरकारी टँकरचा समावेश आहे.ऑक्टोबरच्या तुलनेत संख्या वाढलीपाणीपुरवठा विभागातर्फे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यात एकूण ८९७ वाड्यांमध्ये तर ३०५ गावांमध्ये एकूण ३२२ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्यात ३७ सरकारी, तर २८५ खासगी टँकरचा समावेश होता. मात्र नोव्हेंबरच्या प्राप्त आकडेवारीनुसार पहिल्याच आठवड्यात राज्यातील एकूण ९३९ वाड्यांमध्ये तर, ३१२ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत आहे. यात एकूण ३२२ टँकर असून, यातील ३८ सरकारी आणि २८४ खासगी टँकर आहेत.जिल्हा गावे वाड्या टँकरनाशिक १०६ २३६ ९८धुळे १ ० १जळगाव ९ ० ९नगर ६ ४७ ४पुणे १० ६१ १२सातारा ६३ २६८ ६२सांगली ३२ २७१ ६२सोलापूर ४ ३५ ४संभाजीनगर ५५ २ ५९जालना २६ १९ ४०Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *