विशाखापट्टणम: आज भारत आणि ऑस्ट्रेलियामधील दुसरा वनडे सामना आज खेळवला जात आहे. या सामन्यावर पावसाचे सावट आहे. भारताने पहिला वनडे सामना ५ विकेट्सने जिंकला होता. आता दुसराही सामना जिंकून मालिका आपल्या नावे करण्याचा संघाचा प्रयत्न असेल. आजच्या सामन्यात भारताचा नियमित कर्णधार संघात परतला आहे.

IND vs AUS 2nd ODI LIVE: भारत आणि ऑस्ट्रेलियामधील दुसऱ्या वनडे सामन्याचे लाईव्हअपडेट्स

>> पुढच्या चेंडूवर अजून एक धक्का, भारत ३ बाद ३५ धावा
रोहित आऊट होताच सूर्यकुमार यादव मैदानात आला. स्टार्कच्या पहिल्याच चेंडूवर तो पुन्हा LBW आऊट झाला आहे. सूर्यकुमार खाते न उघडताच आऊट झाला.

>> भारताला दुसरा मोठा धक्का
स्टार्कच्या पाचव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर रोहित शर्मा १३ धावा करत बाद झाला आहे.

>> शुभमन गिल झेलबाद
स्टार्कच्या पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर शुभमन गिल खाते न उघडताच झेलबाद झाला.

>> दुसऱ्या वनडे सामन्याला सुरुवात
भारताकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिलची जोडी मैदानात आहे. तर ऑस्ट्रेलियाकडून स्टार्क पहिली गोलंदाजी करत आहे.

>> भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी

>> ऑस्ट्रेलिया: ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅबुशेन, ॲलेक्स केरी (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस स्टॉइनिस, शॉन ॲबॉट, नॅथन एलिस, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा

>> दुसऱ्या वनडे सामन्याची नाणेफेक
दुसऱ्या वनडे सामन्याची नाणेफेक ऑस्ट्रेलियाने जिंकली आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया पहिली फलंदाजी करणार.

>> विशाखापट्टणममधील हवामानाचा अंदाज
कमाल तापमान: २६अंश सेल्सिअस
किमान तापमान: २३ अंश सेल्सिअस
पावसाची शक्यता: ८०%
ढगाळ वातावरण: ७६%
वाऱ्याचा वेग: ३२ किमी/ता

>> पावसाचे सावट
दुसऱ्या वनडे सामन्यावर पावसाचे सावट अजूनही आहे. सामन्यादरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सामना सुरू असताना उन्हाचा तडाखा असण्याची शक्यता असली तरी सामना जसा पुढे सरकेल तास हवामानात बदल होऊ शकतो. सायंकाळी ३ ते ५ दरम्यान पावसाची शक्यता आहे.

>> भारत आणि ऑस्ट्रेलियामधील दुसरा वनडे सामना
भारत ऑस्ट्रेलिया तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा वनडे सामना १९ मार्च आज खेळवला जात आहे. भारताने पहिला सामना ५ विकेट्सने जिंकला होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *