[ad_1]

रायपूर: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात भारताने २० धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करत भारताने ९ बाद १७४ धावा केल्या होत्या. उत्तरादाखल ऑस्ट्रेलियाला १५४ धावा करता आल्या. दोन्ही संघातील पाचवी आणि अखेरची टी-२० मॅच ३ डिसेंबर रोजी बेंगळुरू येते होणार आहे.

भारताने दिलेल्या १७५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने चांगली सुरूवात केली होती. ४० धावांवर त्यांनी पहिली विकेट गमावली. रवी बिश्नोईने जोश फिलिप माघारी पाठवले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने नियमित अंतराने विकेट गमावल्या. कर्णधार मॅथ्यू वेडने सर्वाधिक नाबाद ३६ धावा केल्या. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर दीपक चहरने २, बिश्नोई आणि आवेश खान यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

त्याआधी चौथ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने ५ तर भारताने संघात ४ बदल केले होते. भारताच्या डावाची सुरूवात यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांनी केली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी ५० धावांची भागिदारी केली. जयस्वाल २८ चेंडूत ३७ धावा करून माघारी परतला. त्याच्या जागी आलेल्या श्रेयस अय्यरने निराशा केली. तो फक्त ८ धावांवर बाद झाला. तर कर्णधार सूर्यकुमार फक्त १ धावांवर माघारी परतला. यामुळे भारताची अवस्था ३ बाद ६३ अशी झाली होती. चौथ्या विकेटसाठी ऋतुराज आणि रिंकू सिंह यांनी ४८ धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. ऋतुराजने २८ चेंडूत ३२ धावा केल्या.

दुखापतीमुळे हार्दिक पंड्याचे स्वप्न भंगले? टी-२० वर्ल्डकपमध्ये रोहितच असणार कर्णधार, BCCIच्या एका मेलने सर्व गोंधळ दूर झाला
त्यानंतर रिंकू आणि जितेश शर्मा यांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. या दोघांनी धावांचा वेग वाढवला. शर्माने फक्त १९ चेंडूत ३ षटकार आणि २ चौकारासह ३५ धावा केल्या. तर रिंकू सिंहने २९ चेंडूत २ षटकार आणि ४ चौकारांसह ४६ धावा केल्या. अखेरच्या षटकात धावा करण्याच्या प्रयत्नात भारताने विकेट गमावल्या. टीम इंडियाने २० षटकात ९ बाद १७४ अशी समाधानकारक धावसंख्या उभी केली.

Read Latest Sports News And Marathi News

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *