नागपूर : दुसऱ्या सामन्याचा टॉस भारताचा कर्णधार रोहित शर्माने जिंकला. रोहितने यावेळी टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याची निर्णय घेतला. या सामन्यासाठी भारतीय संघआत दोन मोठे बदल करण्यात आले आहेत.

दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात दोन मोठे बदल झाले आहेत. या सामन्यासाठी उमेश यादवला विश्रांती दिली आहे आणि त्याच्या जागी जसप्रीत बुमरा संघात आला आहे. त्याचबरोबर यावेळी रिषभ पंतला संघात स्थान देण्यात आले आहे.

यावेळी आठ षटकांचा हा सामना होणार आहे. प्रत्येक खेळाडूला जास्तीत जास्त दोन षटकं टाकता येतील आणि पॉवर प्ले हा दोन षटकांचा असेल.

या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघात मोठे बदल होऊ शकतात. कारण भारतासाठी हा सामना करो या मरो, असा असणार आहे. कारण हा सामना गमावल्यावर भारताचे या मालिकेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे भारतासाठी हा सामना महत्वाचा आहे. त्यामुळेच या सामन्यासाठी संघ कसा निवडला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.

दुसऱ्या ट्वेन्टी सामन्यासाठी भारतीय संघात तीन बदल होऊ शकतात, असे म्हटले जात होते. यापूर्वी नागपूरमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये सामना झाला होता. या सामन्यात चहरने ३.२ षटकांत फक्त सात धावा दिल्या होत्या आणि तब्बल सहा फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता. चहरच्या या कामगगिरीच्या जोरावर भारताने हा सामना ३० धावांनी जिंकला होता. त्यामुळे या सामन्यासाठी जर चहरला संधी दिली तर त्याचे मनोबल वाढू शकते आणि त्याचा फायदा भारताला होऊ शकतो. त्यामुळे चहरला या सामन्यात संधी मिळू शकते. पण चहरला संघात संधी द्यायची असेल तर हर्षल पटेल किंवा उमेश यादव यांच्यापैकी एकाला संघाबाहेर जावे लागू शकते, असे म्हटले जात होते.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात युजवेंद्र चहल हा चांगलाच महागडा ठरला होता. कारण त्याने गेल्या सामन्यात ३.२ षटकांमध्ये ४२ धावा दिल्या होत्या. त्यामुळे आता या सामन्यासाठी चहलला संघाबाहेर केले जाऊ शकते, असे म्हटले जात होते. पण त्याच्या जागी कोणाला संधी द्यायची, हा मोठा निर्णय भारतीय संघाला घ्यावा लागणार होता. त्यचाबरोबर या सामन्यात भुवनेश्वर कुमारला संघाबाहेर केले जाऊ शकते, असेSource link

Leave a Reply

Your email address will not be published.