मुंबई: टी २० विश्वचषक सुरू होण्यापूर्वी वर्ल्डकपचा यजमान संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत घरच्या मैदानावर तीन दिवसीय टी २० मालिका खेळणार आहे. हे सामने विश्वचषकापूर्वी भारतीय संघासाठी एक प्रकारे सराव असेल. या मालिकेतील पहिला सामना मोहालीत होणार आहे. या मालिकेत टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांसाठी घातक ठरू शकतो. हा खेळाडू जेव्हा जेव्हा ऑस्ट्रेलियासमोर खेळतो तेव्हा तो ऑस्ट्रेलियन फलंदाजांची दाणादाण उडवतो. टी २० क्रिकेटमधील या खेळाडूचे आकडे ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्तम आहेत.

ऑस्ट्रेलियासाठी हा खेळाडू डोकेदुखी ठरणार

टीम इंडियाचा घातक वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-२० मालिकेत समावेश करण्यात आला आहे. काही काळापासून जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर होता. जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियन फलंदाजांसाठी मोठी अडचण ठरणार आहे. त्याचा एक विक्रम ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्तम आहे.

कसोटीपटूचा टॅग दिलेला खेळाडू आता ऑस्ट्रेलियाची दाणादाण उडवणार, शमीच्या जागी मिळाला भारताला घातक गोलंदाज

लवकरच फॉर्ममध्ये परतणे आवश्यक

आशिया चषक २०२२ साठी संघाची घोषणा होण्यापूर्वी बुमराहला दुखापत झाली होती. जसप्रीत बुमराहला पाठीला दुखापत झाली होती. अशा स्थितीत त्याला लवकरच आपली लय परत मिळवायची आहे. बुमराह हा ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील टी-२० सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० क्रिकेटमध्ये एकूण ११ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ११ डावात २०.१३ च्या सरासरीने १५ विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहनंतर या यादीत आर आश्विनचा समावेश आहे, त्याने १० विकेट्स घेतल्या आहेत. तर भुवनेश्वर कुमार आणि रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी ८-८ विकेट्स घेण्यात यश मिळाले आहे.

भारतावर विशेष प्रेम, गोमातेचा भक्त! टेनिसचा बादशाह रॉजर फेडररकडे आहे ‘गंगा’

टी-२० क्रिकेटमध्ये अधिक यश

जसप्रीत बुमराहने टीम इंडियासाठी आतापर्यंत ५८ टी-२० सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये जसप्रीत बुमराहने ६.४६ च्या इकॉनॉमीने धावा देत ६९ विकेट घेतल्या आहेत. शेवटच्या षटकांमध्येही तो खूप प्रभावी ठरतो. त्याचबरोबर जसप्रीत बुमराहने टीम इंडियासाठी ३० कसोटी सामने आणि ७२ एकदिवसीय सामने ही खेळले आहेत. त्याच्या नावावर एकदिवसीय सामन्यात १२१ आणि कसोटीत १२८ विकेट्स आहेत.

बजरंग पुनियाने रचला इतिहास,जागतिक कुस्ती स्पर्धेत इतकी पदक मिळवणारा पहिला

भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव , हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.

ऑस्ट्रेलिया संघ :

ॲरॉन फिंच (कर्णधार), स्टीव्हन स्मिथ, टीम डेव्हिड, ग्लेन मॅक्सवेल, ॲश्टन अगर, कॅमेरॉन ग्रीन, डॅनियल सॅम्स, शॉन ॲबॉट, जोश इंग्लिस, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, केन रिचर्डसन, ॲडम झाम्पा, नॅथन एलिस .Source link

Leave a Reply

Your email address will not be published.