मोहाली: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील टी-२० मालिकेतील पहिला सामना मोहाली येथे खेळला गेला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ॲरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या फलंदाजची उत्तम सुरूवात झाली नाही पण मधल्या फळीतील फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारली. पण तरीही संघाला पराभव पत्करावा लागला. परंतु या सामन्यात स्ंनघाला पराभव पत्करावा लागला असला तरीही संघाची एक चिंता मिटली असल्याचे आपण म्हणू शकतो.

आशिया कपमध्ये विराट कोहलीने डावाची सुरुवात करताना शतक झळकावले होते. त्याचवेळी केएल राहुल या स्पर्धेत अपयशी ठरला होता. अशा स्थितीत त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्याची मागणी सातत्याने होत होती. यानंतरही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात राहुलला रोहित शर्मासोबत डावाचा सलामीवीर म्हणून पाठवण्यात आले.

रोहित शर्माने पकडला कार्तिकचा गळा, LIVE सामन्यात असं घडलं तरी काय?

२००० धावा पूर्ण केल्या

भारताचा सलामीवीर केएल राहुलने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन हजार धावा पूर्ण केल्या आहेत. राहुलने २०१६ मध्ये भारतासाठी पहिला टी-२० सामना खेळला होता. त्याने ५८ व्या डावात दोन हजार धावा पूर्ण केल्या. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद दोन हजार धावा पूर्ण करणारा तो तिसरा फलंदाज आहे. पाकिस्तानच्या बाबर आझमने ५२ तर विराट कोहलीने ५६ डावात दोन हजार धावा पूर्ण केल्या होत्या. त्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचला मागे टाकले. त्याने ६२ डावात अशी कामगिरी केली. त्यापाठोपाठ न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅक्युलम आणि मार्टिन गप्टिल यांचा क्रमांक लागतो.

सचिन तेंडुलकरचा वर्ल्डकपमधील मोठा विक्रम धोक्यात; ऑस्ट्रेलियात हा दिग्गज खेळाडू

कारकीर्द

केएल राहुलने भारतासाठी आतापर्यंत ६२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याच्या बॅटने ५८ डावात ३९.६७ च्या सरासरीने आणि १४१.३२ च्या स्ट्राईक रेटने २०१८ धावा केल्या आहेत. यादरम्यान राहुलने १८ अर्धशतके आणि दोन शतके झळकावली आहेत. त्याची सर्वात मोठी खेळी ११० धावांची आहे.

कोण आहे नारायण व्यास? सचिन तेंडुलकरलाही भेटण्याचा मोह आवरता आला नाही
३ षटकार आणि ४ चौकारांसह उत्कृष्ट खेळी

केएल राहुलने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात ५५ धावा केल्या. त्याच्या खेळीत ४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. आशिया कपदरम्यान त्याच्या स्ट्राईक रेटवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात राहुलने सुरुवातीपासूनच वेगवान धावा केल्या. ३५ धावा होईपर्यंत टीम इंडियाला दोन मोठे धक्के बसले होते. यानंतर राहुलने सूर्यकुमार यादवसोबत तिसऱ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.