नागपूर : पावसामुळे दुसऱ्या सामन्याच्या टॉसला उशिर झाला. त्यामुळे हा सामला सुरु कधी होणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती. पण याबाबतची अपडेट आता समोर आली आहे.

नागपूरमध्ये पाऊस थांबला असला तरी मैदान ओले असल्यामुळे टॉस उशिरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंचांनी पहिल्यांदा संध्याकाळी ७.०० वाजता पाहणी केली. पण त्यानंतर त्यांनी काही काळ थांबण्याचा निर्णय घेतला आहे. आता दोन्ही पंच हे रात्री ८.०० वाजता पुन्हा पाहणी करतील आणि त्यावेळी सामना कधी सुरु करायचा, याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. पण जर पुन्हा पाऊस पडला तर अजून काही काळ थांबावे लागेल. पण जजर पाऊस पडला नाही तर रात्री ८.०० वाजता सामना किती वाजता सुरु होणार, हे स्पष्ट होणार आहे.

आज हा सामना नागपूरमध्ये खेळवला जात असून आजच्या सामन्याचा टॉस होण्यासाठी विलंब होणार आहे. आजच्या सामन्यावर पावसाचे सावट नक्कीच असू शकते. आज दुपारी पाऊस पडल्याने दोन्ही संघांचे सराव सेशन रद्द करण्यात आले. आजच्या सामन्यासाठीची आऊटफील्ड ओली असल्याने टॉससाठी उशिरा होणार आहे. दोन्ही संघ सामना खेळण्यासाठी सज्ज झाले असून पाऊस सामन्यामध्ये अडथळा निर्माण करत आहे.

सामने कुठे पाहता येणार, जाणून घ्या…
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका ही स्टार स्पोर्ट्स वाहिन्यांवर लाइव्ह पाहता येणार आहे. स्टार स्पोर्ट्स समूहातील काही चॅनेल्सवर हे सामने पाहता येतील. त्याचबरोबर या सामन्यांचे लाइव्ह अपडेट्स तुम्हाला महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉमवर पाहता येऊ शकतात.

विश्वचषकासाठी होऊ शकतात प्रयोग…
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका ही विश्वचषकासाठी महत्वाची ठरू शकते. कारण विश्वचषक ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. त्यामुळे या मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या संघाबरोबर भारताचा चांगला सराव होऊ शकतो. त्याचबरोबर विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला अजून काही प्रयोग करायचे असतील तर त्यांना या मालिकेत करता येऊ शकतात.

भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव , हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.

ऑस्ट्रेलिया संघ :
ॲरॉन फिंच (कर्णधार), स्टीव्हन स्मिथ, टीम डेव्हिड, ग्लेन मॅक्सवेल, ॲश्टन अगर, कॅमेरॉन ग्रीन, डॅनियल सॅम्स, शॉन ॲबॉट, जोश इंग्लिस, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, केन रिचर्डसन, ॲडम झाम्पा, नॅथन एलिस.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.