मुंबई: भारतीय क्रिकेट संघाला आजपासून ऑस्ट्रेलियासोबत तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. या सामन्यांसाठी भारतीय संघ देखील सज्ज झाला आहे. आज पहिला सामना हा मोहाली येथे खेळवला जाईल. टीम इंडियाला या मालिकेत सहाव्या किंवा सातव्या गोलंदाजाची उणीव भासू शकते. मात्र, ही उणीव आता क्वचितच भासेल, कारण भारताचा स्टार फलंदाज संघातील सहाव्या किंवा सातव्या गोलंदाजाची उणीव दूर करणार आहे.

कोण आहे हा स्टार फलंदाज

हो स्टार फलंदाज म्हणजे भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आहे. आशिया कपमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज देखील ठरला आहे. मंगळवारी होणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्याच्या पूर्वसंध्येला या खेळाडूने गोलंदाजीचा जोरदार सराव सुरु केला. पंजाब क्रिकेट असोसिएशनने (PCA) ट्विटरवर काही फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये विराट गोलंदाजीचा सराव करताना दिसत आहे.

फायनल मॅच आधी एक निनावी फोन आला आणि भारताने मॅच…; टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाचा
भारताचा माजी कर्णधार विराटने मोहालीच्या आयएस वृंद्रा स्टेडियममध्ये जवळपास ३० मिनिटे गोलंदाजीचा सराव केला. यादरम्यान त्याने क्रॉस लेग अॅक्शनने गोलंदाजी केली. कोहलीच्या या सरावामुळे तो आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत गोलंदाजी करताना दिसणार असल्याचे मानले जात आहे.

सोशल मिडीयावर शेयर केले फोटो

पंजाब क्रिकेट असोसिएशनने त्यांच्या इन्स्टाग्रामवर विराटचे गोलंदाजी करताना विविध फोटो शेयर केले. त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहीले आहे, ‘पाहा उद्या गोलंदाजीची सुरुवात कोण करणार’ अनेकांनी यावर कमेंट देखील केली आहे. काहींनी ‘व्हिडिओ शेयर करा’ म्हटलं आहे तर काही म्हणाले ‘भारताचा सहावा गोलंदाजीचा पर्याय’ अशा कमेंट केल्या आहेत.

IND vs AUS-सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाला पराभवाचं टेन्शन! भारतीय संघामध्ये दाखल भारतीय

आशिया कप २०२२ मध्ये गोलंदाजी केली होती

विराटने अलीकडेच आशिया कप २०२२ मध्ये हाँगकाँगविरुद्ध गोलंदाजी केली होती. त्याला ६ वर्षांनंतर टी-२० मध्ये गोलंदाजी केली होती, जिथे त्याने ६ धावांची उत्कृष्ट ओव्हर टाकली. कोहलीने आतापर्यंत १०१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४ बळी घेतले आहेत. कोहलीने २०१६ मध्ये हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यापूर्वी टी-२० सामन्यात गोलंदाजी केली होती.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.