आज संपूर्ण देशभरात दिवाळी साजरी होत असून अशात चाहत्यांना डबल धमाका पहायला मिळू शकतो. क्रिकेटच्या रेकॉर्ड बुकमध्ये आज एक ऐतिहासिक विक्रमाची नोंद होऊ शकते. क्रिकेट विश्वात रन मशिन अशी ओळख असलेला भारताचा विराट कोहलीला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याची संधी आहे. जर आजच्या लढतीत विराटची बॅट चालली तर नेदरलँड्सची धुलाई निश्चित आहे.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांच्या सचिनच्या विक्रमाशी विराटने बरोबरी केली आहे. ५ नोव्हेंबर रोजी द.आफ्रिकेविरुद्ध झालेल्या लढतीत विराटने नाबाद १०१ धावा केल्या होत्या. सचिनच्या ४९ शतकांच्या विक्रमाशी बरोबरी विराटने फक्त २७७ डावात केली होती.
सचिननने ४६३ वनडेतील ४५२ डावात ४४.८३च्या सरासरीने १८ हजार ४२६ धावा केल्या आहेत. ज्यात ४९ शतकांचा समावेश आहे. विराटने आज शतक केल्यास हा टप्पा तो आज पार करेल.
वर्ल्डकपमध्ये विराट शानदार फॉर्ममध्ये आहेत. त्याने २ शतक आणि ४ अर्धशतक केली आहेत. आफ्रिकेविरुद्ध शतक करण्याआधी त्याने बांगलादेशविरुद्ध नाबाद १०३ धावा केल्या होत्या. तर न्यूझीलंडविरुद्ध ९५, ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८५ आणि श्रीलंकेविरुद्ध ८८ धावा केल्या होत्या. या स्पर्धेत त्याची ३ शतकं हुकली आहेत. या तीन पैकी एक शतक झाले असते तर विराटने सचिनचा विक्रम याआधीच मोडला असता.
वनडेत सर्वाधिक शतक करणारे खेळाडू
सचिन तेंडुलकर- ४५२ डावात ४९ शतकं
विराट कोहली- २७७ डावात ४९ शतकं
रोहित शर्मा- २५१ डावात ३१ शतकं
रिकी पॉन्टिंग- ३६५ डावात ३० शतकं
सनथ जयसूर्या- ४३३ डावात २८ शतकं
Read Latest Sports News And Marathi News