ऑकलंड : भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात ३०६ धावांचा डोंगर रचला होता. पण तिनेश धावांचा पल्ला पार करूनही भारतीय संघाला का पराभव स्विकारावा लागला, याचे मोठे कारण आता कर्णधार शिखर धवनने सांगितले आहे.

पहिल्या वनडे सामन्यात भारताची पहिली फलंदाजी होती. न्यूझीलंडविरुद्ध भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. या पहिल्या वनडे सामन्यात कर्णधार शिखर धवन (७२ धावा), शुभमन गिल (५० धावा) आणि श्रेयस अय्यर (८० धावा) यांनी दमदार फटकेबाजी केली. या तिघांच्याही अर्धशतकांच्या जोरावर भारताने ५० षटकांत तिनशे धावांचा पल्ला गाठला आणि या सामन्यात त्यांना ३०६ धावांचा डोंगर उभारता आला. भारताने या सामन्यात धावांचा डोंगर उभारला तरी त्यांना यावेळी गोलंदाजांची चांगली साथ मिळाली नाही.

पहिल्या वनडेमध्ये भारताचा पराभवा झाला. यानंतर धवन म्हणाला की, “आम्ही चांगली धावसंख्या उभारली आणि पहिल्या १५ षटकांमध्ये आम्हाला खेळपट्टीची मदतही मिळाली. ऑकलंडमधील मैदान इतर मैदानांपेक्षा थोडे वेगळे आहे आणि आम्हाला परिस्थितीनुसार नियोजन करावे लागेल. या सामन्यात आम्ही गोलंदाजीची दिशा चांगली ठेवली नाही, त्याबरोबर आम्हाला चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकता आले नाहीत. आम्ही आखूड टप्प्याचे चेंडू जास्त टाकले. या गोष्टीचा फायदा टॉम लॅथमने घेतला आणि आमच्याकडून सामना हिसकावून घेतला. या सामन्यात अखेरच्या १० षटकांमध्ये दिशाच बदलल्याचे पाहायला मिळाले. आम्ही या सामन्यात खेळण्याचा आनंद लुटला खरा, पण हा सामना मात्र आम्हाला जिंकता आला नाही.” त्यामुळे या पराभवानंतर धववने पराभवाचे खापर हे गोलंदाजीवर ठरले आहे, त्यामुळे भारताच्या पराभवाचे एकमेव कारम हे गोलंदाजी असल्याचे धवनने यावेळी स्पष्ट केले आहे.

भारताचा कर्णधार धवन पुढे म्हणाला की, ” या दौऱ्यासाठी जो भारताचा संघ निवडला गेला आहे, त्यामध्ये तरुण खेळाडूंचा भरणार आहे. त्यांना या दौऱ्यात भरपूर काही शिकता येऊ शकते आणि त्यांच्याकडून अन्य खेळाडूंनाही बरेच काही शिकता येऊ शकते. आमच्याकडून सामन्याच्या दुसऱ्या सत्रात बऱ्याच चुका झाल्या. फलंदाजीमध्ये आम्ही चांगली कामगिरी केली, ही जमेची बाजू आहे. पण दुसऱ्या सत्रात मात्र गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये आम्ही बऱ्याच चुका केल्या, त्यामुळे आमच्याकडून हा सामना निसटल्याचे पाहायला मिळाले.”

पहिल्या वनडेमध्ये न्यूझीलंडच्या दोन फलंदाजांनी भारताच्या हातून सामना हिरावला. टॉम लॅथमने नाबाद शतक (नाबाद १४५) झळकावले आणि भारतासाठी तो मोठा अडसर ठरला. यावेळी लॅथमलाकर्णधार केन विल्यमसनने नाबाद अर्धशतक (नाबाद ९४) झळकावत चांगली साथ दिली. या सामन्यात चौथ्या विकेटसाठी लॅथम आणि केन यांनी २२१ धावांची भागीदारी झाली आणि तिथेच सामना भारताच्या हातून निसटला. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंडने जिंकला आहे, या विजयासह त्यांनी मालिकेत १-० अशी दमदार आघाडी घेतली आहे. आता जर त्यांनी एक सामना जिंकला तर त्यांना ही मालिका जिंकता येऊ शकते.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *