मुंबई: आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ मधील पहिली सेमीफायनल भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू झाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने साखळी फेरीतील सर्व लढतीत विजय मिळवला आहे. आता टीम इंडियासमोर न्यूझीलंडचे आव्हान आहे. या लढती विजय मिळवणाऱ्या संघ अंतिम फेरीत पोहोचेल. महाराष्ट्र टाईम्स सोबत या लढतीचे सर्व अपडेट…
भारत विरुद्ध न्यूझीलंड Live अपडेट (IND vs NZ )
> भारताच्या डावाला सुरूवात- शुभमन गिल आणि रोहित शर्मा मैदानात
> भारताने टॉस जिंकला प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
> वानखेडे मैदानावर वर्ल्डकप २०२३ मध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ३ वेळा तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या एकदा विजय मिळवलाय
> वर्ल्डकप २०२३ च्या साखळी फेरीत भारताने न्यूझीलंडवर ४ विकेटनी विजय मिळवला होता