कोच द्रविड यांनी एका वाक्यात न्यूझीलंडला धोक्याचा इशारा दिलाय. भारतीय संघाला वर्ल्डकप सेमीफायनलमधील दबाव कसा हाताळायचा याची पूरेपूर जाणीव आहे.
वर्ल्डकप २०२३ मध्ये भारतीय संघ सर्वात यशस्वी संघ आहे. स्पर्धेत भारत हा एकमेव संघ आहे ज्याचा एकाही सामन्यात पराभव झालेला नाही. साखळी फेरीनंतर आता भारतीय चाहते सेमीफायनलच्या लढतीसाठी उत्सक आहेत. ही सेमीफायनल भारतासाठी सर्वात कठीण असेल याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे २०१९च्या वर्ल्डकपमधील सेमीफायनलमधील भारताचा झालेला पराभव होय.
वनडे वर्ल्डकपमध्ये भारत पुन्हा एकदा सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडसमोर आला आहे. या लढतीत भारतासमोर थोडा दबाव असेल करण ही नॉकआउट मॅच आहे. मात्र या लढतीबाबत कोच राहुल द्रविड दबावात नाहीत. स्पर्धेतील या लढतीतील दबाव कसा हाताळायचा हे संघाला माहिती असून ते संघाच्या विजयाबद्दल निश्चिंत आहेत.
द्रविड म्हणाले, आम्हाला कल्पना आहे की ही एक महत्त्वाची आणि नॉकआउट मॅच आहे. या लढतीत काही प्रमाणात दबाव असेल हे देखील आम्हाला माहिती आहे. मात्र ज्यापद्धतीने आम्ही आतापर्यंत या दबाव हाताळला आहे आणि त्याला उत्तर दिले आहे ते पाहता आमचा आत्मविश्वास वाढेल. संघाच्या दृष्टीकोनात आणि तयारीत कोणताही बदल नाही.
Read Latest Sports News And Marathi News