मुंबई: आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. रोहित शर्माने संघात कोणताही बदल केलेला नाही. भारता प्रमाणेच न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनने संघात कोणताही बदल केलेला नाही.
वानखेडे मैदानावरील एक्स फॅक्टर
वानखेडे मैदानावरील एक्स फॅक्टर
वर्ल्डकप २०२३ मध्ये वानखेडे स्टेडियमवर झालेल्या लढतीपैकी ३ वेळा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे तर फक्त एकदा दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे.
असा आहे भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
टॉस झाल्यावर काय म्हणाला रोहित
आम्ही प्रथम फलंदाजी करू. विकेट चांगली दिसते. एका बाजूने थोडी धीमी वाटते. आम्ही जे काही करू ते चांगले करण्याचा प्रयत्न करतो. मला आठवते आम्ही २०१९ साली सेमीफायनल खेळलो होतो. न्यूझीलंड एक असा संघ आहे तो सातत्याने चांगली कामगिरी करतोय. हा दिवस किती महत्त्वाचा आहे हे आम्हाला माहिती आहे. ज्या गोष्टी नियंत्रित करता येतात त्यावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे.