वर्ल्डकप २०२३ मध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील साखळी फेरीतील लढत धरमशाला येथे झाली होती. या लढती भारताने ४ विकेटनी विजय मिळवला होता. भारताचे वर्ल्डकपमधील न्यूझीलंडविरुद्धचे रेकॉर्ड चांगले नाही, तरी देखील टीम इंडियाने यावेळी साखळी फेरीत शानदार कामगिरी करून दाखवली होती. आता पुन्हा एकदा टीम इंडियासमोर न्यूझीलंडचे आव्हान असेल. भारताला जर फायनलमध्ये पोहोचायचे असेल तर या पाच गोष्टी कराव्या लागतील.
१) डेवॉन कॉन्वेला लवकर बाद करणे- सेमीफायनलमध्ये भारतासमोर न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज कॉन्वेचे मोठे आव्हान असेल. कॉन्वे फिरकी आणि जलद गोलंदाज दोघांना फार चांगल्या पद्धतीने खेळतो. अशाच रोहित आणि कंपनीला त्याला लवकर बाद करावे लागले.
२) शानदार फॉर्ममध्ये आहे रचिन रविंद्र- भारताच्या विजयात दुसरा मोठा अडथळा असेल तो रचिन रविंद्रन होय. रचिनने स्पर्धेत आतापर्यंत ३ शतक झळकावली आहेत. ५००हून अधिक धावा त्याच्या नावावर असून जर सेमीफायनलमध्ये भारताविरुद्ध त्याची बॅट चालली तर रोहित शर्मासमोर मोठी अडचण निर्माण होऊ शकते.
३) मधळ्या फळीतील धोकादायक फलंदाज- न्यूझीलंडचा डेरिल मिचेल सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे. संघात मधळ्या फळीत तो जर मैदानावर राहिला तर लवकर बाद होत नाही. अशात भारतीय गोलंदाजांना सर्वात आधी त्याला बाद करावे लागेल.
४)मिचेल सॅटनरची फिरकी- न्यूझीलंडकडे मिचेल सॅटनरसारखा एक चांगला फिरकीपटू आहे, जो सातत्याने विकेट मिळवतोय. त्याने ९ सामन्यात १६ विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे भारतीय फलंदाजांना त्याच्यापासून सावध रहावे लागले.
५) ट्रेंड बोल्डचा वेग- जगातील सर्वात वेगवान गोलंदाजात बोल्टचा समावेश होतो. वर्ल्डकप २०२३ मध्ये अद्याप त्याने खास कामगिरी केली नसली तरी तो धोकादायक आहे. भारतीय गोलंदाजांना त्याच्या चेंडूवर विचार पूर्वक खेळावे लागले. बोल्टच्या पॉवर प्लेमधील ओव्हर खेळताना जर त्याला संधी दिली नाही तर मग भारतासाठी धावा करणे सोपे जाईल.
Read Latest Sports News And Marathi News