टीम साऊथीच्या नावावर नकोसं शतक
टीम साऊथी न्यूझीलंडच्या प्रमुख बोलर पैकी एक समजला जातो. आजच्या सामन्यात मात्र त्याची जादू पाहायला मिळाली नाही. टीम साऊथीनं १० ओव्हर्समध्ये १० च्या इकोनॉमीनं १०० धावा दिल्या. साऊथीच्या नावावर अशा प्रकारे नकोस शतक नोंदवलं गेलं. साऊथीनं रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांना बाद केलं. अन्यथा टीम इंडियानं ४०० धावांचा टप्पा पार केला असता. साऊथीसह इतर गोलंदाज देखील महागडे ठरले. ट्रेंट बोल्टनं १० ओव्हर्समध्ये ८६ धावा दिल्या त्यानं एक विकेट घेतली.
रोहितनं पाया रचला विराट- श्रेयसनं कळस चढवला
रोहित शर्मा गेल्या काही सामन्यांपासून डावाची सुरुवात करताना आक्रमक फलंदाजी करताना पाहायला मिळतो. आक्रमक फलंदाजीद्वारे सुरुवातीलाच तो प्रतिस्पर्धी संघाला बॅकफूटवर ढकलताना दिसून येतो. आज देखील डावाच्या सुरुवातीला रोहित शर्मानं २९ बॉलमध्ये ४७ धावा केल्या यामध्ये चार षटकारांचा समावेश होता. यानंतर शुभमन गिल यानं ८० धावा केल्या. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी शतकी खेळी केली. विराटनं एकदिवसीय कारकीर्दितील ५० वं शतक पूर्ण केलं. यानंतर के.एल. राहुल यानं देखील फटकेबाजी करत संघाला ३९७ धावांपर्यंत पोहोचवलं.Read Latest And