मुंबई: वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये सहाव्या आणि आठव्या ओव्हरमध्ये मोहम्मद शमीने न्यूझीलंडच्या दोन्ही सलामीवीरांना बाद केले. भारताने दोन मोठ्या विकेट घेऊन मॅचवर पकड मिळवली होती. पण त्यानंतर डॅरिल मिशेल आणि केन विल्यमसन यांनी तिसऱ्या विकेटसाठी पावने दोनशे धावांची भागिदारी करून भारतीय गोटात काळजी वाढवली होती.

मिशेल आणि विल्यमनस ही जोडी भारताला पराभवाचा झटका देतील की काय असे वाटत असताना २९व्या ओव्हरमध्ये बुमराहच्या गोलंदाजीवर शमीने केनचा एक सोपा कॅच सोडला. या घटनेमुळे संपूर्ण स्टेडियमवर एकच शांतता पसरली. भारताला हा कॅच महागात पडले असे वाटत असताना ड्रिंक ब्रेक झाला.

IND vs NZ: रोहित शर्माने फक्त टॉस जिंकला नाही मॅच देखील; समोर आला विजयाचा सर्वात मोठा X फॅक्टर

ब्रेकनंतरची दुसरी ओव्हर डावातील ३३वी ओव्हरला रोहितने चेंडू शमीच्या हातात दिला. ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर मिशेलने एक धाव काढली. दुसऱ्या चेंडूवर केनने हवेत शॉट खेळला आणि सीमा रेषेवर सूर्यकुमार यादवने सोपा कॅच सोडण्याची चूक केली नाही. भारताला एक मोठा ब्रेक शमीने मिळवून दिला. ज्या शमीने ४ ओव्हरपूर्वी केनचा कॅच सोडला होता त्यानेच संघाचे झालेले नुकसान भरून दिले.

विराट कोहलीने मोडले सचिन तेंडुलकरचे २ ऐतिहासिक वर्ल्ड रेकॉर्ड; क्रिकेटच्या इतिहासात आजवर कोणालाही जमले नाही
केनच्या विकेटचा जल्लोष अजून थांबला नव्हता तेव्हढ्यात शमीने न्यूझीलंडला आणखी एक धक्का दिला. ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर लेथमला LBW बाद केले आणि न्यूझीलंडची चौथी विकेट पडली. एकाच षटकात दोन विकेट घेऊन न्यूझीलंडला शमीने जो झटका दिला त्याने ते बॅकफूटवर गेले. केनने ६९ धावा केल्या. त्याआधी मिशेलने शतक पूर्ण केले. या वर्ल्डकपमधील हे त्याचे दुसरे शतक ठरले. केन आणि मिशेल यांनी तिसऱ्या विकेटसाठी १८१ धावांची भागिदारी केली. भारताविरुद्ध कोणत्याही विकेटसाठी न्यूझीलंडकडून झालेली ही चौथ्या क्रमांकाची मोठी भागिदारी ठरली आहे.

वर्ल्डकपमध्ये भारताने केला आजवर कोणालाही न जमलेला विक्रम; अय्यरने तर थेट गांगुलीचा विक्रम मोडला
या दोन विकेटसह शमीने वर्ल्डकपमध्ये ५० विकेटचा टप्पा पार केला. स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम शमीच्या नावावर आहे. आता वर्ल्डकपमध्ये ५० विकेट घेणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.

Read Latest Sports News And Marathi News



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *