कोलंबो: आशिया कप २०२३ च्या सुपर ४ टप्प्यात आज म्हणजेच १० सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. या हायव्होल्टेज सामन्याची मजा पावसामुळे खराब होणार आहे. त्यामुळे, चाहते आता या सुपर 4 स्टेजसाठी खूप उत्सुक आहेत. पण पावसाने या सामन्याची उत्सुकता पुन्हा एकदा खराब केली आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. कारण या अटीतटीच्या सामन्यात पाऊस बरसण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. जाणून घेऊया कसा आहे हवामानाचा अंदाज.

भारत-पाकिस्तानचा दुसरा सामनाही रद्द होणार

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या मोठ्या सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची भीती आहे. आशिया कपमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दुसऱ्यांदा पाकिस्तानशी भिडणार आहे. यापूर्वीचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. हवामान खात्यानुसार, आज कोलंबोमध्ये पावसाची ९० टक्के शक्यता आहे. याचाच अर्थ आजच्या सामन्यातही पाऊस गोंधळ निर्माण करू शकतो.

Weather.com नुसार, १० सप्टेंबर रोजी कोलंबोमधील हवामान आणखीनच खराब झाले आहे. यापूर्वी तेथे पावसाची ९० टक्के शक्यता होती. पण, आता त्यात वाढ झाली आहे. आणि, आता पावसाची शक्यता १०० टक्के आहे. कोलंबोतील हवामानातील या बदलाचा परिणाम आता संपूर्ण भारत-पाकिस्तान सामन्यावर होणार आहे.

मात्र, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर 4 सामन्यासाठी राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे. पावसामुळे रविवारी सामना पूर्ण झाला नाही तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी सामना जिथे थांबवला होता तिथून सुरू होईल. पण चिंतेची बाब म्हणजे ११ सप्टेंबरला म्हणजेच सोमवारी (राखीव दिवस) मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सलग दुसरा सामनाही पावसामुळे रद्द होऊ शकतो.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

या सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ :

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), इमाम-उल-हक, फखर जमान, सलमान आगा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फहीम अश्रफ, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ.

भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), इशान किशन, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *