विशाखापट्टनम: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरी लढत आज मंगळवारी सात वाजता विशाखापट्ट्नम येथे होणार आहे. पहिल्या दोन सामन्यात भारताचा दारुण पराभव झाल्याने मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी टीम इंडियाला विजय मिळवणे गरजेचा असेल. आज भारताचा पराभव झाल्यास मालिका देखील गमवावी लागले.

याआधी भारतात द.आफ्रिकेने २०१५ साली वनडे आणि टी-२० मालिका जिंकली होती. तेव्हा महेंद्र सिंह धोनी कर्णधार होता. त्यानंतर द.आफ्रिकेला भारतात एकही मालिका जिंकता आली नाही. त्यामुळेच ऋषभ पंतच्या समोर आज एक मोठे आव्हान असेल.

वाचा- असं कुठवर चालणार; रोहित शर्मा नसेल तर तुम्ही जिंकणार नाही का?

दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा ४ विकेटनी पराभव झाला होता. तिनही फॉर्मेटमध्ये मिळून भारताचा हा द.आफ्रिकेविरुद्धचा सलग सातवा पराभव होता. याआधी भारतला २ कसोटीत आणि ३ वनडेत पराभव स्विकारावा लागला होता.

वाचा- नुपूर शर्माच्या पुतळ्याला फाशी; भारताचा क्रिकेटपटू भडकला, पाहा काय म्हणाला…

कसे असेल पिच

डॉ.वायएस राजशेखर रेड्डी क्रिकेट मैदानावरील पिच हे गोलंदाजीसाठी पोषक असेल. या मैदानावर गोलंदाजांची कामगिरी नेहमी चांगली होती. फिरकीपटूंना खास संधी आहे. आतापर्यंत या मैदानावर झालेल्या २ टी-२० सामन्यात प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. १२७ ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

भारताचा संभाव्य संघ – ईशान किशन, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, रवी बिश्नोई, उमरान मलिक, युजवेंद्र चहलSource link

Leave a Reply

Your email address will not be published.