IND vs SA: पहिल्या टी-२० मध्ये दक्षिण आफ्रिकेने भारताचा ७ गडी राखून पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत ०-१ अशी आघाडी घेतली. आता मालिकेतील दुसरा सामना कटकमध्ये खेळवला जाणार आहे, परंतु त्यापूर्वी कटकमध्ये तिकीट विक्रीदरम्यान चाहत्यांनी गोंधळ घातल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. काही महिला रांगेतून पुढे आल्याने तिकीट विक्रीवरून गोंधळ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत माहिती देताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, काही महिला रांगेच्या पुढे आल्याने तिकीट विक्रीवरून गोंधळ झाला, त्यानंतर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. अतिरिक्त जिल्हा पोलिस आयुक्त प्रमोद रथ म्हणाले, “काउंटरवर सुमारे ४०,००० लोक उपस्थित होते तर १२,००० तिकिटांची विक्री सुरू होती. तिकीट विक्रीची प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी पोलिसांना या काळात सौम्य बळाचा वापर करावा लागला.”

वाचा – पंतच्या पहिल्याच टी-२० सामन्यात संघाच्या नावावर नकोसा विक्रम; पाहा काय झाले सामन्यात

ओडिशा क्रिकेट असोसिएशन (ओसीए) ने ऑफलाइन विक्रीसाठी सुमारे १२,००० तिकिटे बाजूला ठेवली होती, जी सर्व विकली गेली, असे त्याचे सचिव संजय बेहरा यांनी सांगितले. प्रत्येक व्यक्तीला वैध आयडी पुरावा सादर केल्यावर, जास्तीत जास्त दोन तिकिटे दिली गेली असे बेहरा यांनी सांगितले. याशिवाय बुधवारी रात्रीपासून महिलांसह अनेक लोक रांगेत थांबलेले दिसले. यापूर्वी, ५,००० तिकिटे ऑनलाइन विकली गेली होती आणि आणखी ८,००० तिकिटे ओडिशा क्रिकेट असोसिएशनशी (ओसीए) संबंधित क्लब, शाळा आणि इतर संस्थांना विकली गेली होती.

दरम्यान, पोलीस आयुक्त एसके प्रियदर्शी यांनी सांगितले की, दोन्ही संघातील खेळाडूंच्या सुरक्षेसाठी तीन थरांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तिकिटांच्या विक्रीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी स्टेडियमभोवती प्रत्येकी ३० कर्मचार्‍यांचा समावेश असलेल्या दहा पलटण पोलिस तैनात करण्यात आले आहेत, असे ते म्हणाले.

वाचा – भारताचा या पाच चुकांमुळे झाला पराभव अन् विश्वविक्रमाची संधीही गमावली

दरम्यान, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना इशान किशनच्या अर्धशतकाच्या जोरावर पाहुण्या संघासमोर २१२ धावांचे भव्य लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात व्हॅन डर डुसेन आणि डेव्हिड मिलर यांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ५ चेंडू राखून ही धावसंख्या गाठली. टी-२० क्रिकेटच्या इतिहासात भारताला २०० पेक्षा जास्त धावा करून पराभूत होण्याची ही पहिलीच वेळ आहे. अशा परिस्थितीत ऋषभ पंत आणि उर्वरित खेळाडूंच्या नजरा आता आगामी सामन्यांमध्ये बदला घेण्यावर असेल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.