मुंबई : ९ जूनपासून सुरू झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेतील चौथा सामना आज खेळवला जाणार आहे. गुजरातमधील राजकोट क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी ७ वाजता दोन्ही संघांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. मालिकेत टिकून राहण्यासाठी ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील भारत आज राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर ‘करो या मरो’ या रणनीतीसह उतरणार आहे. दुसरीकडे, आजचा सामना जिंकून दक्षिण आफ्रिका भारतीय भूमीवर दुसरी टी-२० मालिका जिंकण्यासाठी पूर्ण जोर लावेल.

ऋषभ पंतकडून आस
आपल्या खराब फॉर्मशी झगडत असलेला प्रभारी कर्णधार ऋषभ पंतला या सामन्यातून फॉर्ममध्ये परतण्याची अपेक्षा असेल. गेल्या तीन सामन्यांमध्ये पंतला फारसे काही योगदान देता आलेले नाहीत, त्यामुळे या सामन्यात चाहत्यांना त्याच्याकडून मोठ्या आशा असतील. तसेच तिसर्‍या सामन्यात इशान किशन, ऋतुराज गायकवाड आणि हर्षल पटेल यांच्या शानदार कामगिरीनंतर त्यांच्याकडूनही संघाची नौका पार करण्याच्या अपेक्षा आणखी वाढल्या असतील.

वाचा – विजयाचे स्वप्न पाहणाऱ्या टीम इंडियाला जोरदार धक्का; ‘हुकुमी एक्का’ आफ्रिकेच्या संघात परतला

क्विंटन डी कॉकचे पुनरागमन?
मनगटाच्या दुखापतीमुळे गेल्या दोन सामन्यातून बाहेर बसलेला डी कॉकच्या चौथ्या सामन्यात पुनरागमन करण्याचा निर्णय अखेरच्या क्षणी घेतला जाईल. मात्र चौथ्या सामन्याच्या पूर्वसंध्येला डी कॉक सराव सत्रात दिसला, त्यानंतर आजच्या सामन्यात त्याचे पुनरागमन अपेक्षित आहे.

पाच सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेत भारत १-२ ने पिछाडीवर असून हा सामना देखील ‘करो या मरो’चा होणार आहे. भारतासाठी चांगली गोष्ट म्हणजे विझागमधील शेवटच्या सामन्यात त्यांचे दोन्ही सलामीचे फलंदाज चांगल्या लयीत दिसले आणि त्यांनी आपली अर्धशतकेही झळकावली.

वाचा – भारतासाठी धोक्याची घंटा; टीम इंडिया सोबत रोहित शर्मा इंग्लंडला का गेला नाही?

पीच रिपोर्ट
राजकोट स्टेडियमवरील खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे आणि पहिल्या डावात सरासरी १८३ धावसंख्या आहे आणि गोलंदाजांना त्यांच्या हातात कठीण काम आहे. तीन टी-२० पैकी दोन संघाने धावसंख्येचा पाठलाग करताना जिंकले आहेत.

वाचा – रणजी करंडक क्रिकेट : मुंबईचा संघ जवळपास अंतिम फेरीत, मिळवली त्रिशतकी आघाडी

भारत-दक्षिण आफ्रिका संभाव्य प्लेइंग इलेव्हन
भारत: ऋषभ पंत (कर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युझवेंद्र चहल.

दक्षिण आफ्रिका: टेंबा बावुमा (कर्णधार), रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर डुसेन, डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), ड्वेन प्रिटोरियस, वेन पारनेल, कगिसो रबाडा, केशव महाराज, एनरिक नॉर्खिया, तबरेझ शम्सी.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.