सेंट किट्स: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरी लढत आज सोमवार १ ऑगस्ट रोजी सेंट किट्स येथे होणार आहे. मालिकेतील पहिली लढत जिंकून भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. आता दुसऱ्या सामन्यात ही आघाडी आणखी वाढवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.

दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताचे लक्ष्य फक्त विजय मिळवण्याचे नाही तर त्याच बरोबर वेस्ट इंडिजविरुद्ध एक मोठा विक्रम करण्याचे असेल, जो विक्रम आता पाकिस्तान क्रिकेट संघाच्या नावावर आहे. भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध आतापर्यंत २१ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

आज सेंट किट्समध्ये जेव्हा टीम इंडिया मैदानात उतरेल तेव्हा वेस्ट इंडिजविरुद्धची २२वी मॅच असेल. आतापर्यंत झालेल्या २१ लढतीत भारताने १४ सामने जिंकले आहेत. तर ६ मध्ये त्यांचा पराभव झाला. एका सामन्याचा निकाल लागला नाही.

वाचा- CWG 2022 India Day 4 LIVE: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या चौथ्या दिवसाचे लाइव्ह अपडेट

पाकिस्तान क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० सामन्यात १५ विजय मिळवले आहेत. त्यांनी २१ सामन्यात ही कामगिरी केली आहे. आता भारतीय संघाला पाकिस्तानच्या या विक्रमाची बरोबरी करण्याची आणि तो मागे टाकण्याची संधी आहे.

सेंट किट्सवर वेस्ट इंडिजचा दबदबा

दोन्ही संघात होणारी पहिली टी-२० लढत त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियवर झाली होती. आता दुसरी लढत सेंट किट्स येथे होईल. सेंट किट्सच्या वॉर्नर पार्क, बस्सेटेरे स्टेडियमवर वेस्ट इंडिजची कामगिरी आतापर्यंत चांगली झाली आहे. या मैदानावर त्यांनी १० टी-२० पैकी ६ लढती जिंकल्या आहेत. तर दोन मध्ये पराभव आणि दोन लढतींचा निकाल लागला नाही. दुसऱ्या बाजूला भारत प्रथमच या मैदानावर टी-२० मॅच खेळणार आहे.

वाचा-मोक्याच्या क्षणी वजनाचा लोड, क्रॅक झाल्याचा आवाज अन् सुवर्णपदक हुकलं, सांगलीच्या

पहिल्या टी-२० लढतीत भारताने ६८ धावांनी विजय मिळवाल होता. प्रथम फलंदाजी करत भारताने १९० धावा केल्या होत्या उत्तरादाखल वेस्ट इंडिजला १२२ धावा करता आल्या.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.