कोलंबो : एकाच दगडात दोन पक्षी कसे मारायचे, याचा उत्तम वस्तुपाठ भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दाखवला. कारण भारताने या एकाच सामन्यात पाकिस्तानला दन मोठे धक्के दिले आहेत.भारताने पाकिस्तानवर २२८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. हा सामना जर पावसामुळे रद्द झाला असता तर दोन्ही संघांना समान १ गुण दिला असता. पण हा सामना आता भारताने जिंकला आहे, त्यामुळे आता भारतीय संघाला दोन गुण मिळाले आहे. त्यामुळे आता गुणतालिकेत भारत आणि पाकिस्तान यांचे समान २ गुण झाले आहेत. पण गुण जरी दोन असले तरी त्यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. कारण या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा संघ हा गुणतालिकेत अव्वल स्थानावर होता. त्यामुळे ते अंतिम फेरीचे दावेदार समजले जात होते. पण या एका सामन्याने सर्व काही बदलले आहे. कारण भारताने मोठा विजय मिळवला आणि त्यामुळेच त्यांचा रन रेट चांगलाच वाढला आहे. या सामन्यानंतर भारताचा रन रेट हा ४.५६० एवढा झाला आहे. गुणतालिकेत हा सर्वात जास्त रन रेट आहे, त्यामुळे भारतीय संघाने या गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. पाकिस्तानचेही यावेळी दोन गुण असले तरी त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांचा रन रेट – १.८९२ असा झाला आहे. हा सर्वात कमी रन रेट आहे. त्यामुळे पाकिस्तानचा संघ हा गुणतालिकेत पहिल्या स्थानावरून थेट तिसऱ्या स्थानावर ढकलला गेला आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पाकिस्तानला रन रेटचा यावेळी मोठा फटका बसला आहे. आता त्यांचा एकच सामना सुपर ४ मध्ये शिल्लक आहे. या सामन्यात त्यांना विजय तर मिळवावाच लागेल, पण विजय मिळवल्यावरही ते आशिया कप स्पर्धेबाहेर जाऊ शकतात. कारण त्यांना रन रेट हा सर्वात कमी आहे. त्यामुळे एका सामन्यात पाकिस्तानने पाकिस्तानला दोन मोठे धक्के दिले आहेत. भारताच्या या विजयाने गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे.