नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. पण जेव्हा या मालिकेसाठी भारतीय संघ निवडण्यात आला तेव्हा बहुतांशी चाहत्यांना धक्का बसला. कारण या फक्त तीन सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयने दोन संघ निवडले आहेत. बीसीसीआयने तीन सामन्यांसाठी दोन संघ का निवडले, याचे मोठे कारण आता समोर आले आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे सामना हा मोहाली येथे खेळवण्या येणार आहे. हा सामान शुक्रवारी २२ सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वनडे सामना हा इंदोरच्या होळकर मैदानात रंगणार आहे. हा सामना रविवारी २४ सप्टेंबरला होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा आणि मालिकेतील अखेरचा वनडे सामना हा बुधवारी २७ सप्टेंबरला रंगणार आहे. हा सामना राजकोटला खेळवण्यात येणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेत हे तीनच सामने खेळवले जाणार आहेत. पण या तीन सामन्यांसाठी बीसीसीआयने दोन संघ निवडले आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जे पहिले दोन सामने होणार आहेत, त्यासाठी बीसीसीआयने संघाचे कर्णधारपद हे लोकेश राहुलकडे दिले आहे. या संघात रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्यासारख्या अनुभवी खेळाडूंना स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे या संघात सालामीवीर म्हणून ऋतुराज गायकवाडची निवड केली गेली आहे. पण या मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यासाठी मात्र बीसीसीआयने वेगळा संघ निवडला आहे. या संघात रोहित, कोहलीसारख्या अनुभवी खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. या तिसऱ्या वनडे सामन्यासाठी लोकेश राहुलकडे भारताचे नेतृत्व नसून रोहित शर्माकडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. भारताने हे दोन वेगवेगळे संघ का निवडले, याचे मोठे कारणही आता समोर आले आहे. भारतीय संघ नुकतीच आशिया चषक स्पर्धा खेळून आला आहे, ज्यामध्ये त्यांनी अंतिम फेरीत श्रीलंकेला पराभूत करत जेतेपद पटकावले. त्यानंतर आता ही मालिका होणार आहे आणि त्यानंतर वनडे वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. पण संघातील काही वरिष्ठ खेळाडूंना आशिया कपनंतर आणि वर्ल्ड कपपूर्वी थोडी विश्रांती द्यायला हवी, असा विचार बीसीसीआयने केला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन्ही वनडे सामन्यांसाठी अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. वर्ल्ड कपला लयीत येण्यासाठी त्यांना तिसऱ्या वनडे सामन्यात संधी देण्यात आली आहे.

फायनल जिंकून टीम इंडिया हॉटेलमध्ये परतल्यावर क्रिकेटप्रेमींचा जल्लोष

बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी भारताच्या संघात चांगलाच समतोल साधला आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *