[ad_1]

मुंबई : भारताने सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडला पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. पण फाय़नलमध्ये पोहोचत आता भारतीय संघाने एक इतिहास रचला आहे. कारण यापूर्वी भारतीय संघाला ही गोष्ट कधीच जमली नव्हती.भारताने सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडला पराभूत केले ते मोहम्मद शमीच्या गोलंदाजीच्या जोरावर. कारण न्यूझीलंडचे फलंदाज चांगली कामगिरी करत होते. त्यामुले त्यांच्या धावांवर अंकुश ठेवणे गरजेचे होते. शमीने आपल्या पहिल्याच चेंडूवर भारताला विकेट मिळवून दिली होती. त्यानंतर दुसऱ्या षटकात पुन्हा एकदा न्यूझीलंडला धक्का दिला. त्यानंतर भारताला जेव्हा विकेट्सची गरज होती. त्यावेळी रोहित शर्माने शमीच्या हातात चेंडू दिला आणि शमीने आपल्यावरील विश्वास योग्य असल्याचे दाखवून दिले. शमीने त्यावेळी आपल्या एकाच षटकात न्यूझीलंडला दोन धक्के दिले. शमीने प्रथम केन विल्यमसनला ६९ धावांवर बाद केले. त्यानंतर शमीने त्याच षटकात टॉम लॅथमला बाद केले. त्यानंतर पुन्हा एकदा सामन न्यूझीलंडच्या बाजूने झुकत असताना रोहितने पुन्हा शमीला गोलंदाजी दिली. शमीने पुन्हा एकदा भारताला मोलाची विकेट मिळवून दिली. शमीने यावेळी डॅरिल मिचेलला बाद केले आणि तिथेच हा सामना फिरला. त्यामुळे शमी हा या सामन्यातील विजयाचा नायक ठरला. पण या विजयासह भारताने एक मोठा इतिहास आता आपल्या नावावर केला आहे. आतापर्यंत भारताला कधीही अपराजित राहून वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश करता आला नव्हता. भारताने १९८३ आणि २०११ साली वर्ल्ड कप जिंकला होता. पण यावेळीही भारताला पराबव पत्करावा लागला होता जेव्हा ते फायनलमध्ये पोहोचले होते. पण पहिल्यांदाच भारताने यावेळी एकही सामना न गामवता थेट अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे भारतासाठी हा विजय सर्वात महत्वाचा आहे. भारताने हा सामना जिंकत आता फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय संघ आता १९ नोव्हेंबरला फायनल खेळताना दिसेल. त्यामुळे आता या सामन्यानंतर भारतीय संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *