कोलंबो : भारताने श्रीलंकेवर तब्बल १० विकेट्स राखून दमदार विजय मिळवला. भारताने यापूर्वीही १० विकेट्स राखून विजय मिळवले आहेत. पण या सामन्यात मोठा विजय मिळवत भारतीय संघाने इतिहास रचला आहे. कारण यापूर्वी अशी कामगिरी भारताला कधीही करता आली नव्हती.

भारताने मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्सच्या जोरावर हा विजय साकारला. यापूर्वी भारताने बरेच मोठे विजय मिळवले. पण हा विजय भारतासाठी खास आहे. कारण एवढा मोठा विजय भारताला यापूर्वी कधीही मिळवता आले नव्हता. पण या सामन्यातील विजयाने मात्र भारतीय संघाला मोठे यश मिळवून दिले आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताने साकारलेला हा सर्वात मोठा आहे. भारताने यापूर्वी कधीही एवढे जास्त चेंडू राखून कधीही विजय मिळवला नव्हता. यापूर्वी भारताने २००१ साली केनियावर असाच १० विकेट्स राखून विजय मिळवला होता. पण त्यावेळी भारताने २३१ चेंडू राखून विजय साकारला होता. पण यावेळी मात्र भारताने तब्बल २६३ चेंडू राखून विजय साकारला आहे. त्यामुळे यापूर्वी भारताला कधीही एवढा मोठा विजय मिळवता आला नव्हता. त्यामुळे आता या सामन्यात भारताने हा विजय साकारत इतिहास रचला आहे. त्यामुळे भारतीय संघाला हा सामना कधीही विसरता येणार नाही. या सामन्यात मोहम्मद सिराजने सहा विकेट्स मिळवत एतिहासिक कामगिरी केली आहे. यापूर्वी त्याला अशी कामगिरी यापूर्वी कधीही करता आली नव्हती. त्यामुळे वर्ल्ड कप पूर्वी त्याने जी कामगिरी केली आहे, त्याचा फायदा त्याला वर्ल्ड कपमध्ये नक्कीच होईल. या विजयासह भारतीय संघ हा चांगल्या लयीत आला आहे. कारण गोलंदाजीत तर भारताने दमदार कामिगिरी केली, पण फलंदाजीतही त्यांनी एकही विकेट गमावली नाही. त्यामुळे भारतासाठी हा विजय सर्वात महत्वाचा असेल.

आशिया चषक: भारत व पाकिस्तान यांचा आज सामना

भारताने या आशिया चषकात दमदार कामगिरी केली. त्यांना फक्त बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला. कारण भारताने पाकिस्तान आणि श्रीलंका यांना धुळ चारली होती. त्यामुळे या मोठ्या संघांवर मात करत त्यांनी आशिया चषकाचे जेतेपद पटकावले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *