नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यावरून आता जय शहा हे मोठ्या वादात अडकले आहेत. जय शहा हे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावरून चांगलेच ट्रोल व्हायला लागले आहेत. पण जय शाह वादात अडकले आहे, याचे कारण आता समोर आले आहे.भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आता १० सप्टेंबरला कोलंबो येथे होणार आहे. आशिया कपमधील हा दुसरा सामना असेल. कारण यापूर्वी २ सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आशिया कपमध्ये खेळवला गेला होता, जो पावसामुळे रद्द करण्यात आला होता. पण आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा सामना रद्द होऊ नये, यासाठी आशिया कपचे नियम बदलले गेले आहेत. यापूर्वी फक्त आशिया कपच्या अंतिम फेरीसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला होता. पण आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर ४ सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. त्यामुळे तर पावसामुळे १० सप्टेंबरला हा सामना झाला नाही तर तो ११ सप्टेंबरला खेळवला जाऊ शकतो. चाहत्यांसाठी हा एक चांगला निर्णय होता. पण त्यानंतर आता जय शहा हे वादात अडकले आहेत. कारण जय शाह हे आशिया क्रिकेट कौन्सिलने अध्यक्ष आहेत, ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आशिया कपच्या सुपर ४ फेरीत सहा सामने होणार आहेत. पण या सहा सामन्यांपैकी फक्त भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठीच राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आशिया कपमध्ये श्रीलंका आणि बांगलादेश यांना वेगळा न्याय का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. जय शाह हे आशिया क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष असून बीसीसीआयचे सचिव आहे, त्यामुळे त्यांना आता याप्रकरणी ट्रोल केले जात आहे. त्यामुळे आता या प्रकरणी जय शहा नेमकं काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठी राखीव दिवस आहे. त्यामुळे या सामन्याचा निकाल आता लागू शकतो आणि चाहत्यांचा हिरमोडही होणार नाही.