[ad_1]

नवी दिल्ली: भारतीय संघ आता विश्वचषक २०२३ नंतर आता टी-२० मालिकेवर लक्ष केंद्रित करत आहे. आता टीम इंडियाला या विश्वचषकातील पराभवाचा जास्त काळ विचार करण्याची संधी मिळणार नाही कारण २३ नोव्हेंबरपासून टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. या टी-२० मालिकेची कमान सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे.

विश्वचषक अंतिम फेरीच्या दुसऱ्या दिवशी (२० नोव्हेंबर) जाहीर झालेल्या संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह विश्वचषक खेळलेल्या बहुतांश वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. पहिल्या तीन सामन्यांसाठी ऋतुराज गायकवाडची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे, तर शेवटच्या दोन सामन्यांसाठी श्रेयस अय्यरची निवड करण्यात आली असून तो संघाचा उपकर्णधारही असेल.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिका २३ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२३ दरम्यान खेळवली जाईल. या टी-२० मालिकेतील सामने अनुक्रमे विशाखापट्टणम, त्रिवेंद्रम, गुवाहाटी, नागपूर आणि हैदराबाद येथे खेळवले जातील. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेतील सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता खेळवले जातील.

भारत ऑस्ट्रेलियामधील या टी-२० मालिकेचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा अ‍ॅप आणि वेबसाइटवर पाहता येईल. त्याचसोबत स्पोर्ट्स 18 आणि कलर्स सिनेप्लेक्स चॅनेलवर तुम्ही भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचे थेट प्रक्षेपण पाहू शकता.

गिल आजारी, किशनला संधी; वेंगसरकरांकडून सूर्यकुमारला प्लेइंग ११ मध्ये घेण्याचा सल्ला

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार.
ऑस्ट्रेलिया टी२० संघ:मॅथ्यू वेड (कर्णधार), जेसन बेहरेनडॉर्फ, शीन अ‍ॅबॉट, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, ट्रॅव्हिस हेड, जोस इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, तन्वीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्नस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅडम झम्पा.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *