विशाखापट्टणम : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-२० सामना आता फक्त काही तासांवर येऊन ठेपला आहे. या सामन्यात नवी टीम इंडिया पाहायला मिळणार आहे. पण यावेळी भारतीय संघात कोणाला संधी मिळणार ते समोर आले आहे.
सलामीवीर…
या सामन्यासाठी सलामीवीर या जागेसाठी तीन खेळाडूंची नावं समोर येत आहेत. सलामीसाठी ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल आणि इशान किशन हे तीन पर्याय भारतापुढे असतील. यावेळी ऋतुराज हा नक्कीच सलामीला येऊ शकतो आणि इशान व यशस्वी यांच्यामध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळेल. पण यशस्वीने दमदार कामगिरी केली आहे, त्यामुळे त्याला सलामीला खेळण्याची संधी मिळेल. कदाचित इशानला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले जाऊ शकते. इशानकडे यावेळी यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते.

मधल्या फळीतील फलंदाज…
भारतीय संघाच्या मधल्या फळीत यावेळी कर्णधार सूर्यकुमार यादव असेल. त्याच्याबरोबर तिलक वर्मा आणि रिंकू सिंग हे भारताच्या मधल्या फळीत असतील. त्याचबरोबर या भारतीय संघात शिवम दुबेसारखा अष्टपैलू खेळाडू आहे. त्यामुळे त्याचा समावेशही यावेळी संघात करण्यात येणार आहे.

फिरकी गोलंदाज…
या संघात रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल हे तीन दमदार फिरकीपटू आहे. पण यावेळी संघात मात्र दोन फिरकी गोलंदाजांना संधी मिळेल,असे दिसत आहे. पहिल्या सामन्यासाठी अक्षर पटेल आणि रवी बिश्नोई या दोन फिरकी गोलंदाजांना संधी मिळेल, असे समोर येत आहे. त्यामुले वॉशिंग्टन सुंदरला संघात स्थान मिळण्यासाठी प्रतिक्षा करावी लागेल.

वेगवान गोलंदाज…
या भारतीय संघात अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खानसारखे चांगल्या दर्जाचे वेगवान गोलंदाज आहेत. पण या सामन्यात मात्र दोन वेगवान गोलंदाजांना संधी मिळू शकते. भारतीय संघात यावेळी अर्शदीप सिंगला नक्कीच संधी मिळू शकते. कारण तो चांगला डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. अर्शदीपबरोबर यावेळी आवेश खान पहिल्या सामन्यात खेळू शकतो, असे समोर येत आहे.

वर्ल्डकप फायनलसाठी किंग शाहरुख पत्नी गौरीसह अहमदाबादला

पहिल्या दोन सामन्यात तरी भारतीय संघात मोठे बदल केले जाणार नाहीत. चौथ्या सामन्यात भारतीय संघात श्रेयस अय्यरचे पुनरामगन होणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *