ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय अंडर-19 संघाची घोषणा:राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविडला खेळण्याची संधी
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बहु-स्वरूपातील घरच्या मालिकेसाठी अंडर-19 संघांची घोषणा केली आहे. या दोन्ही संघात माजी भारतीय फलंदाज आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा मुलगा समित द्रविडची निवड करण्यात आली आहे. ही मालिका २१ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. यामध्ये पाँडेचेरीमध्ये 3 एकदिवसीय सामने आणि चेन्नईमध्ये 2 चार दिवसीय सामने खेळवले जातील. उत्तर प्रदेशच्या मोहम्मद अमानकडे वनडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. तर चार दिवसांच्या मालिकेत मध्य प्रदेशचा सोहम पटवर्धन भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. समित द्रविडला संधी मिळाली
या मालिकेसाठी भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा मुलगा समित द्रविडचीही संघात निवड झाली आहे. 18 वर्षीय वेगवान गोलंदाज अष्टपैलू समित हा एकदिवसीय आणि चार दिवसीय दोन्ही संघांचा भाग आहे. सध्या तो कर्नाटकच्या महाराजा ट्रॉफीमध्ये म्हैसूर वॉरियर्सकडून खेळत आहे. या लीगमध्ये समितची कामगिरी काही विशेष झाली नाही. त्याला 7 डावात केवळ 82 धावा करता आल्या. तर त्याने एकदाही गोलंदाजी केलेली नाही. मात्र, याआधी त्याने कूचबिहार ट्रॉफीमध्ये 362 धावा आणि 16 विकेट्ससह कर्नाटकला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मालिकेचे पूर्ण वेळापत्रक
वनडे मालिकेतील पहिला सामना 21 सप्टेंबर, दुसरा सामना 23 सप्टेंबर आणि तिसरा सामना 26 सप्टेंबर रोजी होणार आहे. तर चार दिवसीय मालिकेतील पहिला सामना 30 सप्टेंबरपासून तर दुसरा सामना 7 ऑक्टोबरपासून होणार आहे. एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ
रुद्र पटेल (उपकर्णधार), साहिल पारख, कार्तिकेय केपी, मोहम्मद अमन (कर्णधार), किरण चोरमले, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंशसिंग पंगालिया (यष्टीरक्षक), समित द्रविड, युधाजित गुहा, समर्थ एन, निखिल कुमार, चेतन शर्मा , हार्दिक राज, रोहित राजावत, मोहम्मद अनन. चार दिवसांच्या मालिकेसाठी भारतीय संघ
वैभव सूर्यवंशी, नित्या पंड्या, विहान मल्होत्रा (उपकर्णधार), सोहम पटवर्धन (कर्णधार), कार्तिकेय केपी, समित द्रविड, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंशसिंग पनगालिया (यष्टीरक्षक), चेतन शर्मा, समर्थ एन, आदित्य निल कुमार, आदित्य कुमार. , अनमोलजीत सिंग, आदित्य सिंग, मोहम्मद अनन.