भारताचा यापूर्वी सर्वात मोठा पराभव हा २०१९ साली झाला होता. हा सामना न्यूझीलंडबरोबर होता आणि तो हॅमिल्टन येथे खेळवण्यात आला होता. या सामन्यात भारताला न्यूझीलंडने तब्बल २१२ चेंडू राखून पराभूत केले होते. म्हणजेच न्यूझीलंडने ३५ षटके आणि दोन चेंडू राखून भारतावर मोठा विजय साकारला होता. पण भारताचा यापेक्षा मोठा पराभव यावेळी पाहायला मिळाला. कारण या सामन्यात ऑस्ट्रेलियाने तब्बल २३४ चेंडू राखून भारताला पराभव केला. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान ११ षटकांत पूर्ण केले. म्हणजेच ऑस्ट्रेलियाने तब्बल ३९ षटके राखून हा विजय मिळवला. त्यामुळे आतापर्यंत प्रथम फलंदाजी करताना वनडे क्रिकेटमध्ये भारताचा हा सर्वात मोठा पराभव ठरला आहे.
भारताचा यावेळी ऑस्ट्रेलियाने १० विकेट्स राखून पराभव केला. यापूर्वीही ऑस्ट्रेलियाने २०२० साली भारताचा असाच १० विकेट्स राखून पराभव केला होता. त्याचबरोबर भारताला गेल्यावर्षी इंग्लंडने टी-२० सामन्यात १० विकेट्स राखून पराभूत केले होते. त्याचबरोबर २०२१ साली भारताला पाकिस्तानने असाच १० विकेट्स राखून पराभव केला होता. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत भारताला चारवेळा असे मोठे पराभव पत्करावे लागले आहेत.