ऑकलंड : भारताला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात तिनशे धावांचा टप्पा ओलांडूनही पराभव पत्करावा लागला. पण भारताच्या हातून हा सामना एका खेळाडूमुळे निसटला असल्याचे आता समोर येत आहे. त्यामुळे भारताच्या हातून सामान कधी आणि कसा निसटला, ही गोष्ट आता समोर येत आहे.

भारताने सामन्याचे पहिले सत्र चांगलेच गाजवले. कारण पहिल्या सत्रात भारताची फलंदाजी होती. भारताच्या तीन फलंदाजांनी यावेळी अर्धशतके झळकावली. यामध्ये सर्वाधिक धावा या श्रेयस अय्यरच्या नावावर होत्या. न्यूझीलंडविरुद्ध भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. या पहिल्या वनडे सामन्यात कर्णधार शिखर धवन (७२ धावा), शुभमन गिल (५० धावा) आणि श्रेयस अय्यर (८० धावा) यांनी दमदार फटकेबाजी केली. या तिघांच्याही अर्धशतकांच्या जोरावर भारताने ५० षटकांत तिनशे धावांचा पल्ला गाठला आणि या सामन्यात त्यांना ३०६ धावांचा डोंगर उभारता आला. भारताने या सामन्यात धावांचा डोंगर उभारला तरी त्यांना यावेळी गोलंदाजांची चांगली साथ मिळाली नाही. त्यामुळेच भारतीय संघाच्या हातून हा सामना निसटला. पण यावेळी सामन्याचा टर्निंग पॉइंट नेमका ठरला तरी काय, हे आता समोर आले आहे.

भारताच्या हातून अखेरच्या १५ षटकांमध्ये सामना निसटला. या अखेरच्या १५ षटकांमध्ये एक षटक असे ठरले की, त्यामध्या सामन्याचा नूरच पालटला. हे षटक होते ते ३९वे. या षटकापूर्वी न्यूझीलंडचा प्रत्येक षटकामागे जवळपास ९ धावांची गरज होती. त्यावेळी भारतीय गोलंदाज चमकदार कामगिरी करतील, असे वाटत होते. यावेळी शार्दुल ठाकूरकडे कर्णधार शिखर धवनने चेंडू सुपूर्द केला आणि तिथेच सामना फिरल्याचे पाहायला मिळाले. कारण या एकाच षटकात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी तब्बल चार चौकार आणि एका षटकारासह २५ धावांची लूट केली. या शार्दुलच्या एका षटकातील २५ धावांमुळे सामना न्यूझीलंडच्या बाजूने झुकला आणि हाच या सामन्यातील टर्निंग पॉइंट ठरल्याचे पाहायला मिळाले. कारण हे एक षटक सामन्यातील महागडे ठरले आणि त्याचा फटका भारताला बसला. त्यामुळे आता पुढच्या सामन्यात शार्दुल ठाकूरला संधी मिळणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष असेल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *