खेळाडूंच्या वाईट वागणुकीमुळे ससेक्सवर १२ गुणांचा दंड ठोठावण्यात आला असून त्यामुळे कर्णधार पुजारावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने ही माहिती दिली. गुणांच्या पेनल्टीमुळे पुजाराच्या नेतृत्वाखालील संघ गुणतालिकेत खाली आला आहे. खरेतर, ससेक्स विरुद्ध लीसेस्टरशायर सामन्यादरम्यान कार्सन आणि हेन्सच्या वर्तनामुळे पुजाराला एका सामन्याच्या बंदीला सामोरे जावे लागले. पुजाराचे निलंबन आणि १२ गुणांच्या कपातीव्यतिरिक्त, हेन्स आणि कार्सन यांना ससेक्सच्या डर्बीशायरविरुद्ध १९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या पुढील सामन्यातूनही वगळण्यात आले आहे.
या संदर्भात, ईसीबीने सांगितले की, “१३ सप्टेंबर २०२३ रोजी लीसेस्टरशायर विरुद्धच्या काउंटी चॅम्पियनशिप सामन्यात दोन अतिरिक्त पेनल्टी गुण मिळाल्यामुळे, ससेक्सने आता एका हंगामात चार निश्चित पेनल्टीची मर्यादा पूर्ण केली आहे, यापूर्वी याच मोसमाच्या चॅम्पियनशिपमध्ये दोन अतिरिक्त पेनल्टी गुण मिळाले होते.”
नेमकं काय घडलं?
२२ वर्षीय ऑफस्पिनर कार्सनने लीसेस्टरशायरच्या बेन कॉक्सला नॉन स्ट्रायकरवर बाद करण्याचा प्रयत्न केला. त्याने ससेक्स वेबसाइटवर केलेल्या कृतीबद्दल माफीही मागितली आहे. शेवटच्या दिवशी ओपनस हेन्सचेही भांडण झाले होते आणि त्याबद्दल त्याने माफीही मागितली आहे. यानंतर मैदानावरील पंचांनी दोन्ही खेळाडूंवर लेव्हल वन आणि लेव्हल टूच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. प्रशिक्षक म्हणाले की संघाने अशा प्रकरणांमध्ये आपली भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे, जे त्यांनी केले आहे.