मुंबई : विराट कोहलीचे महाशतक आणि श्रेयस अय्यसच्या शतकांच्या जोरावर भारताने सेमी फायनच्या विजयाचा भक्कम पाया रचला आहे. कोहलीने यावेळी आपेल ५० वे शतक साजरे करत सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला. कोहली बाद झाल्यावर श्रेयसने आपेल शतक साजरे केले. त्यामुळेच भारताने या सामन्यात धावांचा डोंगर रचला आणि त्यामुळे त्यांनी विजयाचा पाया रचल्याचे यावेळी पाहायला मिळाले. कोहलीने यावेळी ११३ चेंडूंत ९ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर ११७ धावांची नेत्रदीपक खेळी साकारली. श्रेयसने यावेळी ७० चेंडूंत १०५ धावांची धमाकेदार शतकी खेळी साकारली. भारताने यावेळी ३९७ धावा करत विजयाचा पाया रचला.रोहित टॉस जिंकत प्रथम फलंदाजीला आला आणि त्याने एकामागून एक फटक्यांची अतिषबाजी केली. रोहीतने यावेळी न्यूझीलंडच्या गोलंदाजीवर सुरुवातीपासून कडक प्रहार करायला सुरुवात केली. घरच्या मैदानावर फक्त २९ चेंडूत ४७ धावा केल्या. मात्र स्पर्धेतील चौथे अर्धशतक त्याला पूर्ण करता आले नाहीत. मीड ऑफच्या दिशेने मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात टिम साउदीच्या चेंडूवर तो बाद झाला. रोहितने या खेळीत ४ चौकार आणि चार षटकार मारले. घरच्या मैदानावर फक्त २९ चेंडूत ४७ धावा केल्या. मात्र स्पर्धेतील चौथे अर्धशतक त्याला पूर्ण करता आले नाहीत. मीड ऑफच्या दिशेने मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात टिम साउदीच्या चेंडूवर तो बाद झाला. रोहितने या खेळीत ४ चौकार आणि चार षटकार मारले. इतकेच नाही तर रोहितने एका वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा गेलचा विक्रम मोडला. गेलने २०१५च्या वर्ल्डकपमध्ये २६ षटकार मारले होते. आता रोहितच्या नावावर २७ षटकार झाले आहेत. २३व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर शुभमन रिटायर्ड हर्ट झाला. त्याच्या जागी श्रेयस अय्यर फलंदाजीला आला. मुंबईत प्रचंड उकाडा असून फार वारा देखील नाही. गिलच्या मदतीला फिजिओ मैदानात आले होते. मात्र फिजिओसोबत चर्चा करून गिलने मैदान सोडले. गिलने ६५ चेंडूत ३ षटकार आणि ८ चौकारांसह ७९ धावा केल्या. गिल मैदानाबाहेर गेल्यावर फलंदाजीला आलेल्या श्रेयसने यावेळी शतक झळकावले. त्यामुळेच भारताला यावेळी मोठी धावसंख्या उभारता आली. कोहली आणि श्रेयस यांच्या शतकांच्या जोरावर भारताने या सामन्यात न्यूझीलंडपुढे विजयासाठी ३९८ धावांचे आव्हान ठेवले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *