नवी दिल्ली: Infinix New laptop Launched: Infinix ने भारतीय बाजारात आपला नवीन लॅपटॉप InBook X1 Slim ला लाँच केले आहे. या स्लिम लॅपटॉपसह कंपनीने आपल्या लॅपटॉप लाइनअपचा विस्तार केला आहे. हा लॅपटॉप FHD डिस्प्ले आणि तीन प्रोसेसर व्हेरिएंटमध्ये येतो. यात अ‍ॅल्यूमिनियम एलॉय फिनिश डिझाइन दिले असून, याचे वजन १.२४ किलो आहे. Infinix InBook X1 स्लिम लॅपटॉपला तुम्ही स्टारफॉल ग्रे, कॉस्मिक ब्लू, नोबर रेड आणि ऑरोरा ग्रीन या रंगात खरेदी करू शकता. कंपनीने या लॅपटॉपला वेगवेगळ्या कॉन्फिगरेशनसह सादर केले आहे. याची सुरुवाती किंमत ३० हजार रुपयांपेक्षा कमी आहे. Infinix InBook X1 Slim लॅपटॉपच्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

वाचा: Father’s Day : फादर्स डेला ‘या’ स्मार्टवॉच भेट देवून ‘असं’ जपा वडिलांचं आरोग्य

Infinix InBook X1 ची किंमत

  • कोर i३ (८GB+२५६GB): २९,९९० रुपये
  • कोर i३ (८GB+५१२GB): ३२,९९० रुपये
  • कोर i५ (८GB+५१२GB): ३९,९९० रुपये
  • कोर i५ (१६GB+५१२GB): ४४,९९० रुपये
  • कोर i७ (१६GB+५१२GB): ४९,९९० रुपये

Infinix InBook X1 Slim लॅपटॉप २१ जूनपासून फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होईल. लाँच ऑफर अंतर्गत अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट व डेबिट कार्डने पेमेंट केल्यास ३ हजारांची सूट मिळेल.

वाचा: iPhone 14 च्या लाँचआधी iPhone 13 च्या किंमतीत मोठी कपात, खूपच स्वस्तात खरेदीची संधी; पाहा डिटेल्स

Infinix InBook X1 स्लिमचे स्पेसिफिकेशन्स

Infinix InBook X1 स्लिम लॅपटॉपमध्ये १०२०x१०८० पिक्सल रिझॉल्यूशनसह येणारा १४ इंच FHD डिस्प्ले दिला आहे. हा लॅपटॉप Core i3, Core i5 आणि Core i7 १०th जनरेशन Intel प्रोसेसरसह येतो. ग्राहक आपल्या सोयीनुसार यापैकी निवड करू शकतात. यात १६ जीबीपर्यंत रॅम आणि ५१२ जीबीपर्यंत SSD स्टोरेज दिले आहे. Infinix InBook X1 Slim लॅपटॉप विंडोज ११ होम ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. लॅपटॉपमध्ये एचडी वेब कॅमेरा आणि ड्यूल स्टार लाइट दिली आहे. कंपनीचा दावा आहे की, ड्यूल स्टार लाइटमुळे व्हिडिओ कॉलिंग दरम्यान कमी प्रकाशात देखील क्लॅरिटी मिळेल. Infinix InBook X1 Slim मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वेगवेगळे फीचर्स दिले आहेत. यात वाय-फाय, ब्लूटूथ, USB-C,USB ३.०, HDMI पोर्ट आणि SD कार्ड स्लॉटचा समावेश आहे. यात ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५०Wh ची बॅटरी दिली आहे.

वाचा: बाबो! ४६ वर्ष जुन्या Apple-1 कॉम्प्युटरची ‘इतक्या’ कोटींना विक्री, किंमत वाचून धक्का बसेलSource link

Leave a Reply

Your email address will not be published.